*आजादी का अमृत महोत्सवाचे प्रताप विद्या मंदिरात भव्य आयोजन*
चोपडा (प्रतिनिधी) दि.१५ ऑगस्ट २०२२ चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरात ठीक ७:३० वाजता संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री विश्वनाथ अग्रवाल यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने आजादी का अमृत महोत्सव व ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हातात तिरंगा व संस्थेच्या सर्व ज्ञान शाखांमधील विद्यार्थ्यांच्या हातामध्ये स्वतः रंगवलेला राष्ट्रध्वज तिरंगाचे चित्र हातात घेऊन सन्मानाने फडकावित *हर घर झेंडा घर घर झेंडा* ही मोहीम अतिशय सुंदर रित्या दर्शविण्यात आली. विद्यार्थिनींपैकी एक विद्यार्थिनी भारत मातेच्या वेशभूषेत उपस्थित होती.

धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून राष्ट्रध्वज तिरंगा लावलेली झोपडी पासून लाल किल्ल्या पर्यंत सर्वधर्मसमभाव दर्शविणारे फलक लेखन श्री कमलेश गायकवाड यांनी केले.गरीब ,हुशार ,होतकरू विद्यार्थ्यांना श्री सुहास विजय पवार माजी विद्यार्थी यांच्याकडून मान्यवरांच्या हस्ते गणवेश व शालेय साहित्याचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. तिरंगा हमारी शान हे गीत यावेळी श्री पी बी कोळी व श्री पंकज नागपुरे यांच्या गाणं समूहाने सादर केले. मुख्य प्रवेशद्वारापासून अमृत महोत्सवाच्या वेगवेगळ्या छटा दर्शवणाऱ्या रांगोळ्या विविध रंगाने तसेच वस्तूंचा वापर करून तयार करण्यात आलेले तिरंगा ध्वज प्रदर्शित केलेले दिसत होते. शाळेचे बँड पथक , एन सी सी चे कॅडेट ,स्काऊट ,आर एस पी व गर्ल गाईड यांनी देखील आकर्षकता वाढवली. भारत माता व क्रांतिकारकांच्या वेशभूषेत असलेले विद्यार्थी आकर्षणाचे केंद्र ठरले .

या कार्यक्रमासाठी चोपडा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा.विश्वनाथ अग्रवाल, सचिव आ. माधुरीताई मयूर, संस्थाचालक आ.चंद्रहासभाई गुजराथी, कार्यकारणी सदस्य श्री प्रवीणभाई गुजराथी श्री.किरणभाई गुजराथी, श्री शैलेश दादा अग्रवाल, मुख्याध्यापक श्री पी.एस. गुजराथी, उपमुख्याध्यापक श्री एस.जी.डोंगरे. ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री जे एस शेलार , पर्यवेक्षिका श्रीमती एम. डब्ल्यू पाटील, पर्यवेक्षक श्री एस. एस. पाटील, श्री पी डी पाटील सर, श्री योगी भाई मयूर ,संस्था समन्वयक श्री गोविंदभाई गुजराथी, श्री.उल्हासभाई गुजराथी, श्री. डी टी महाजन ,माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक , चोपडा शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध ज्ञानशाखांचा पदाधिकारी, विद्यमान सर्व शिक्षक बंधू-भगिनी, लेखनिक कर्मचारी बंधू व संस्थेच्या पी व्ही एम इंग्लिश मीडियम स्कूल, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृषी तंत्र विद्यालय, अध्यापक विद्यालय, शिक्षण शास्त्र महाविद्यालय, माध्यमिक ,उच्च माध्यमिक , गावातील माध्यमिक , सकाळ व उर्दू माध्यम या सर्वच विभागातील शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी भारताच्या या गौरव सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित होते…. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.व्ही. ए. गोसावी यांनी केले.

