*चोपडा महाविद्यालयात ‘शहीद स्मारक सायकल यात्रा’ उत्साहात संपन्न*
चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव विद्यार्थी विकास विभाग आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चोपडा ते नागलवाडी (शहीद देशभक्त नानाभाऊ सैंदाणे स्मारक) यादरम्यान ‘शहीद स्मारक सायकल यात्रेचे’ आयोजन दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात आले होते. या सायकल यात्रेचे उदघाटनशहरातील माजी सैनिक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक श्री. गोपाळ सोनवणे, श्री. अशोक पाटील, श्री. प्रकाश चौधरी, श्री. गोपीचंद पाटील, श्री. मनोहर पवार, श्री. संदीप बडगुजर, श्री. राजेंद्र बोरसे, श्री. शिवदास अहिरे, श्री. साहेबराव पाटील, श्री. लखीचंद सोनवणे, श्री. रामकृष्ण सैंदाणे, श्री. भिकन पाटील तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.टी.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ, राष्ट्रीय छात्र सेना लेफ्टनंट डॉ. बी. एम. सपकाळ, क्रीडा संचालिका सौ.के.एस. क्षीरसागर, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.पी.के.लभाने आदि मान्यवर उपस्थित होते. या शहीद स्मारक सायकल यात्रेमध्ये ८२ विद्यार्थी तसेच ४० पेक्षा अधिक प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता. नागलवाडी येथे शहीद स्मारक सायकल यात्रा पोहोचल्यानंतर ही यात्रा नागलवाडी गावातून वीर देशभक्त शहीद नानाभाऊ सैंदाणे यांच्या स्मारकाजवळ पोहोचली.

यावेळी आयोजित अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. आशाताई विजय पाटील, वीरपत्नी श्रीमती. निताताई सैंदाणे, सरपंच, उपसरपंच तसेच उपस्थित माजी सैनिक यांच्या हस्ते वीर देशभक्त शहीद नानाभाऊ सैंदाणे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र तसेच माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी वीर देशभक्त शहीद नानाभाऊ सैंदाणे यांचे ज्येष्ठ बंधू श्री.सूर्यभान सैंदाणे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, प्रा. मायाताई शिंदे, नागलवाडी ग्रामपंचायत सरपंच प्रताप भिल, उपसरपंच सचिन पाटील, ग्रामसेवक सुधाकर चौधरी, गोपाल पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी यांनी केले. यावेळी माजी सरपंच धर्मराज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना स्वातंत्र्य उठावाच्या आठवणी कथन केल्या. याप्रसंगी माजी सैनिक गोपाल सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर आपण काय कमावलं? काय गमावलं? याचे चिंतन करायला हवे. देशाच्या विकासासाठी सर्व तरुणांनी व जनतेने नेहमीच प्रयत्नशील असायला हवे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ॲड. संदीप सुरेश पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांना शहीद जवानांच्या कार्याबद्दल माहिती करून देणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यांचा इतिहास जाणून घेऊन शहिदांच्या आठवणींना उजाळा द्यायला हवा. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सेनानींचे चरित्र वाचून त्यातून प्रेरणा घ्यायला हवी. देशाची एकता टिकवण्यासाठी तरुणांनी नेहमीच प्रयत्नशील असावे. तसेच शहीद नानाभाऊ यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांचे बलिदान सर्वांना सदैव स्मरणात राहील असे सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ यांनी केले तर आभार राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट डॉ.बी.एम.सपकाळ यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डी.डी.कर्दपवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.के.लभाने, क्रीडा संचालिका सौ.के.एस.क्षीरसागर, महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.पी.एम.रावतोळे, डॉ.ए.बी.सूर्यवंशी, डी.पी.सपकाळे, डॉ.के.डी.गायकवाड, डॉ.के.एस.भावसार, डॉ. एस.आर.पाटील, डॉ. सी. आर. देवरे, डॉ.एल.बी.पटले, डॉ.एम.एल. भुसारे, डॉ.एच.जी.चौधरी, डॉ.आर. आर.पाटील, मुकेश पाटील, डॉ.जी.जे. पाटील, डॉ.पी. एन. सौदागर, वाय.एन.पाटील, ए.एच.साळुंखे, एम. ए.पाटील, अमोल पाटील, डी.पी. सोनवणे, एम.बी.पावरा, एस.जी.पाटील, आर.एच.पाटील, राजू निकम, भरत भालेराव, सुधाकर बाविस्कर त्याचबरोबर महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट, शिक्षक- शिक्षकेतर बंधू-भगिनी, नागलवाडी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. शहीद जवान नाना सैंदाणे यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
