महाराष्ट्र 9

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती, शेतकरी कृती समितीचे व इनरव्हील क्लब सदस्य चोपडा, यांचा स्तुत्य उपक्रम…#आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ३९९ रूपयात विमा काढून आर्थिक मदतीच्या हात..

[espro-slider id=13780]


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती, शेतकरी कृती समितीचे व इनरव्हील क्लब सदस्य चोपडा, यांचा स्तुत्य उपक्रम…#आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ३९९ रूपयात विमा काढून आर्थिक मदतीच्या हात..
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते काढण्यात आला विमा…


चोपडा प्रतिनिधी :–
कोरोना काळात काही शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्यात,त्यांच्या कुटुंबीयांना मदत व्हावी यासाठी त्यांच्या विधवांना भारतीय डाक विभागाची योजना अंतर्गत ३९९ रूपयात १० लाख रुपयांचा अपघाती विमा काढून देण्यात आले. त्यात अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फरशीवरून पाय घसरून पडणे, अँक्सिडेंट असे सर्व अपघात समाविष्ट आहेत. अपघाती मृत्यु झाल्यास १० लाख रुपये , कायमचे अपंगत्व आल्यास १० लाख, दवाखाना खर्च आल्यास ६० हज़ार रुपये, मुलांच्या शिक्षणाचा खर्च १ लाख रुपयापर्यंत प्रती मुल


(जास्तीत जास्त 2 मुलांना संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत) , अँडमिट असेपर्यंत दररोज १००० रुपये (१० दिवस) ,ओपिडी खर्च – 30000, अपघाताने पॅरालीसीस झाल्यास १० लाख रुपये, कुटुंबाला दवाखाना प्रवासखर्च २५००० रूपये , वेटिंग पीरीयड नाही, वय : १८ ते ६५ वर्ष आहे.
त्यासाठी सर्वाना ३९९/ वार्षिक हप्ता आहे.
यासाठी ५०० रुपये भरुन पोस्टात खाते उघडावे लागेल .त्यातील ३९९ रुपये कट होऊन खात्यात १०१ रुपये शिल्लक राहतात.ही योजना पोस्टाने जरी राबविली असली तरी क्लेम TATA AIG देणार आहे .


यासाठी प्रत्येकाने किमान एका भगिनीचा विमा काढून देणेसाठी मदत करावी अशी विनंती करण्यात आली होती ,त्या साऱ्या भगिनींना पोस्टाचे विमा प्रमाणपत्र १५ ऑगस्ट २०२२ रोजी द्यावे असे अपेक्षित आहे.एस बी पाटील शेतकरी कृती समिती यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून भगिनींना अपघात विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मीनाक्षी निकम (संचालिका, स्वयंदीप संस्था, चाळीसगाव) आणि राहुल पाटील (निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव) उपस्थित होते.


व्यासपीठावर सीमा अहिरे (प्रांताधिकारी अमळनेर) , कृषिकेश रावले (उपविभागीय पोलिस अधिकारी, चोपडा) , डॉ मनोज पाटील ( अधीक्षक, चोपडा उपजिल्हा रुग्णालय), देविदास कुनगर (पोलीस निरीक्षक, चोपडा ग्रामीण),
डॉ पंकज पाटील (निवासी वैद्यकीय अधिकारी बा. सं. जिल्हा रुग्णालय, जळगाव) , संभाजी ठाकूर (जिल्हा कृषी अधिकारी, जळगाव), उल्हास दुसाने (डाक अधीक्षक, भुसावल ), भरत कोसोदे (बी डी ओ पंचायत समिती, चोपडा), हेमंत निकम (मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद), पी बी पाटील (उपकार्यकारी अभियंता, हतनूर विभाग), दीपक साळुंखे ( तालुका कृषी अधिकारी, चोपडा ) ,
अनिल भोकरे (उपसंचालक, कृषी विभाग, जळगाव), अनील गावीत (तहसीलदार, चोपडा),अवतारसिंग चव्हाण (पोलीस निरीक्षक, चोपडा शहर ), डॉ गुरुप्रसाद वाघ (वैद्यकीय अधिकारी, चोपडा उपजिल्हा रुग्णालय), संजय गायकवाड (उपकार्यकारी अभियंता, एम. एस. ई.बी) आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम न प नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]