महाराष्ट्र 9

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त चोपड्यात तालुकास्तरीय रॅलीचे आयोजन…#विद्यार्थ्यांची उपस्थिती उल्लेखनीय पण अनेक अधिकाऱ्यांनी रॅलीला फिरवली पाठ…

[espro-slider id=13780]

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त चोपड्यात तालुकास्तरीय रॅलीचे आयोजन…
विद्यार्थ्यांची उपस्थिती उल्लेखनीय पण
अनेक अधिकाऱ्यांनी रॅलीला फिरवली पाठ…


चोपडा प्रतिनिधी :–
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा या मोहिमेची जनजागृती व्हावी म्हणून शहरांतील विवेकानंद विद्यालय , आशा टॉकीज रोड , गोल मंदीर, तहसिल कार्यालय, महात्मा गांधी चौक , मेन रोड , छत्रपती शिवाजी महाराज चौक , नगरपरिषद कार्यालय पर्यन्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


सदर रॅलीत विद्यार्थ्यांसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर रॅलीचे पत्र तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने तालुक्यातील जवळपास ३१ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले होते पण मात्र काही मोजकेच अधिकारी सदर रॅली प्रसंगी उपस्थित होते तर अनेक अधिकारी वर्गाने सदर रॅलीला दांडी मारली त्यामुळे उपस्थित शिक्षकांमध्ये नाराजीच्या सूर उमटत होता. जर अधिकारीच नियमांची पायमल्ली करत असतील तर सर्वसामान्यांचे काय ? असा प्रश्न देखील उपस्थित शिक्षकांनी केला आहे.
सदर रॅली प्रसंगी चोपडा तालुक्याचे तहसीलदार अनिल गावित, पोलीस उपविभागीय अधिकारी कृषिकेश रावले ,मुख्याधिकारी हेमंत निकम, गटविकास अधिकारी बी एस कोसोदे, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले ,चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पीआय अवतारसिंग चव्हाण, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय अमर वसावे आदी अधिकारी उपस्थित होते.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या थीमवर जिल्हा परिषद शाळा अजंतीसिम या शाळेचे उपशिक्षक प्रवीण माळी यांनी आपल्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या स्वनिर्मित गीताचा व्हिडिओ तयार केला आहे आणि सदर व्हिडिओ पोलीस उपविभागीय अधिकारी कृषिकेश रावले यांच्या शुभहस्ते लॉन्च करण्यात आला सदर व्हिडिओत घोडगाव केंद्रातील शिक्षक, केंद्रप्रमुख तसेच गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले व गटविकास अधिकारी बी एस कोसोदे यांनीदेखील सहभाग घेतला आहे. सदर व्हिडिओची निर्मिती अतिशय उत्कृष्ट झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.सदर रॅलीत विद्यार्थ्यानी भारत माता की जय, वंदे मातरम्, हर घर तिरंगा अशा प्रकारच्या जयघोष करीत परिसर दणाणून सोडला.सदर रॅलीसाठी तहसिलदार यांच्या आदेशाला अनेक अधिकारी वर्गाने केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले. तहसिलदार यांनी पुढील कार्यालयांना रॅलीत सहभागी होण्यासाठी सूचित केल्याचे बोलले जात आहे.


उपविभागीय पोलिस अधिकारी, चोपडा भाग चोपडा , प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यावल, सहा.अभियंता, पाटबंधारे उपविभाग ,उपअभियंता, सार्वजाकि बांधकाम विभाग ,उपविभागीय मृदा संधारण अधिकारी, सहा. निबंधक सहकारी संस्था ,गटविकास अधिकारी, पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चोपडा शहर ,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चोपडा ग्रामीण, मुख्याधिकारी, नगरपालिका चोपडा ,व्यवस्थापक, म.रा.प. महामंडळ , गट शिक्षण अधिकारी, प.स.चोपडा,तालुका आरोग्य अधिकारी, प.स.चोपडा, महाराष्ट्र जिवा प्राधिकरण बांधकाम उपविभाग, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, प.स.,उपअभियंता, जि.प. बांधकाम विभाग, उपअभियंता, जि.प. ग्रामिण पाणीपुरवठा विभाग, सहा.वनसंरक्षक अधिकारी, उपविभागीय अधिकारी गुळ मध्यम प्रकल्प , उपविभागीय अधिकारी, निम्म तापी पुनर्वसन उपविभाग ,उप अधिक्षक भुमी अभिलेख ,दुय्यम निबंधक ,अधिक्षक उप जिल्हा रुग्णालय ,पो. नि. चोपडा शहर / ग्रामिण / अडावद ,रोपवन अधिकारी सामाजिक वनिकरण ,वन क्षेत्रपाल वैजापुर/देव्हारी / अडावद / चोपडा ,एकात्मिक बालविकास अधिकारी प स चोपडा 1 व 2 ,जि प संधारण उप विभाग , वजन माप अधिकारी यावल ता यावल,दुय्यम निरीक्षक चोपडा, राज्य उत्पादन शुल्क जळगांव , तालुका कृषी अधिकारी चोपडा आदी अधिकाऱ्यांनी रॅलीला उपस्थित राहण्याचे तहसीलदार अनिल गावित यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले होते पण मात्र काही मोजकेच अधिकारी रॅलीला उपस्थित होते. अनेक अधिकाऱ्यांनी रॅलीला दांडी मारल्याने उपस्थित शिक्षकांत नाराजी दिसून येत होती..
अनुपस्थित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते ते पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे…

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]