चोपडा तालुक्यात युती धर्म पाळणारा एकमेव नेता घनशाम भाऊ अग्रवाल….

चोपडा प्रतिनिधी चोपडा विधानसभा ची जागा युती ला सुटल्या नंतर भाजपा ने बंडखोरी करत युतीचा विरोधात उमेदवार उभा केला बंडखोरी म्हटली पक्षातील काही नाराज लोकांनी पुकारलेले बंड म्हणजे बंडखोरी असते पण संपूर्ण तालुका बंडखोर कसा?असा प्रश्न सर्वसामान्यांचा समोर उभा राहतो.तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बंड पुकारला होता त्यात फक्त भाजप नव्हे तर चोपडा तालुक्यातील शिवसेनेच्या गटबाजी मुळे पक्षातील माजी आमदार कैलास पाटील यांनी सुद्धा युती धर्म न पाळता भाजपचे बंडखोर उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांना पाठिंबा दिला.त्यामुळे घरकुल घोटाळ्यामुळे शिक्षा झालेल्या चंद्रकांत सोनवणे यांचा समोर मोठे आव्हान उभे राहिले होते. अश्या वेळी भाजपचे एकनाथराव खडसे यांचे खंदे समर्थक घनशाम भाऊ अग्रवाल हे संकट मोचक म्हणून उभे राहिले चोपडा तालुक्यातील राजकारणाचे चाणक्य समजले जाणारे घनशाम भाऊ अग्रवाल यांनी युती धर्म पाळत चंद्रकांत सोनवणे यांचा पत्नी लताबाई सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी सर्व सूत्र हातात घेत चाणक्य नीतीचा वापर करत आता पर्यंतचा सर्वाधिक२०५२९ मतधिक्याने निवडून आणले संपूर्ण पक्ष बंडखोरी करत असताना त्यांनी कोठल्याही दबावाला बळी न पडता युती धर्म पाळत शिवसेनेच्या उमेदवार लताबाई सोनवणे यांना विजय मिळून देण्यात सिंहाचा वाटा आहे त्यांनी केलेल्या कामगिरीचे करावे तेवढे कौतुक कमी आहे याची जाणीव शिवसैनकांमध्ये सुद्धा आहे म्हणून तर लताबाई सोनवणे यांचा विजय निश्चित झाल्या नंतर भाऊंचा घरासमोर विजय उत्सव साजरा करण्याकरता हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली भाऊंना पेढे भरवत खांदयावर घेऊन नाचले






