घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांची प्रकृती खालवल्याने जे जे रुग्णालयात दाखल

जळगाव( प्रतिनिधी):- जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी माजी मंत्री सुरेश जैन यांची तब्येत खालवल्यामुळे आज उपचारार्थ मुंबई येथील जे जे हॉस्पिटल येथे हलविण्यात आले .
सुरेश जैन यांना घरकुल घोटाळा प्रकरणी सात वर्षाची शिक्षा आणि 100 कोटीचा दंडाची शिक्षा झाल्याने त्यांना नासिक कारागृहात ठेवण्यात आले आहे आज अचानक त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे .दरम्यान त्यांची शुगर वाढल्याने ते बेशुद्ध पडले होते त्यांना उच्च रक्तदाब ,छातीत वेदना होत असल्याने त्यांना जे जे हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.