चोपडा विधानसभा निवडणुकीत चुरस कायम तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? चोपडा तालुक्यात ६४.११% झाले मतदान

चोपडा तालुक्यात ६४.११% झाले मतदान

चोपडा (प्रतिनिधी)चोपडा विधानसभा मतदार संघातील तिरंगी लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा पत्नी लताबाई सोनावणे ह्या महायुती चा उमेदवार आहे तर भाजपचे बंडखोर उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे (भाजपचे समाजकल्याण सभापती) आहेत तसेच राष्ट्रवादी तर्फे जगदीशचंद्र वळवी या तिन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर असल्याचे चित्र समोर आहे या कट्याचा लढतीत कोण बाजी मारेल याची उत्कंठा तालुक्या सह जिल्ह्यातही चर्चेचा विषय बनला आहे

चोपडा विधानसभा मतदारसंघ हा एस टी या जागेसाठी राखीव असुन या मतदारसंघात तिन मातब्बर उमेदवार रिंगणात होते शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यात सरळ लढत रंगणार होती कारण युती व आघाडी झालेली असताना भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांनी या मतदारसंघात उडी घेतल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे गेल्या विधानसभा निवडणूकीत पराभव झालेल्या माधुरी किशोर पाटील यांना या निवडणूकीत तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी देखील अपक्ष म्हणून रिंगणात उतरले म्हणून चौरगी लढत होईल असेच चित्र दिसुन येत होते परंतु या निवडणूक मध्ये शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा बंडखोर उमेदवार यांनी मतदारांना आर्थिक लक्ष्मी दर्शन मोठ्या प्रमाणावर दिले तसेच आज देखील दिवसभर शहरासह ग्रामीण भागातील मतदार हा पैसे घेतल्याशिवाय मतदानाला निघाले नसल्याचे चित्र पहावयास मिळाले म्हणून या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराचे भाग्य उजळणार या बाबत तरी आजच्या स्थितीत भविष्य सांगणे यासाठी मात्र मतदार देखील सभ्रमाअवस्थेत असल्याचे दिसुन आले .चोपडा शहरी भागात सकाळी संत गती ने सुरू असलेले मतदान दुपारी चार वाजेनंतर मतदान केंद्रावर लक्षवेधी गर्दी पहायला मिळाली यामुळे शहरातील काही मतदान केंद्रावर साडेसात ते आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते.जिल्ह्यात सर्वात कमी मतदान जळगाव सिटी४०.७%तर सर्वात जास्त मतदान चोपडा तालुक्यात ६४.११%मतदान झाले
चोपडा मतदारसंघात एक उपविभागीय पोलीस अधिकारी,१२ पोलिस अधिकारी तर ३०४ पोलिस कर्मचारी व १५६ होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला असुन कोणत्याही बुथवर वाद नव्हता शांततेत मतदान झाले





