महाराष्ट्र 9

जानेवारीत अखिल भारतीय अल्पसंख्याक जैन महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी उद्घाटनासाठी येणार

[espro-slider id=13780]

जानेवारीत अखिल भारतीय अल्पसंख्याक जैन महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी उद्घाटनासाठी येणार

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोशियारी यांची आज ऑल इंडिया मायनोरिटी फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गाँधी, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री सुशिल टाटीया व मुंबई प्रदेश चे प्रकाश चोपडा यांनी भेट घेतली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न या भेटी दरम्यान येत्या जानेवारीत दि.11 व 12 रोजी गुजरातमधील मणिलक्ष्मी तीर्थ, बडौदा येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण राज्यपालांनी सहर्ष स्वीकारले. याप्रसंगी जैन अल्पसंख्याक महासंघाचे कार्य व विविध मागण्यांविषयी सविस्तर चर्चा करण्यात येऊन कोशियारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रारंभी राज्यपालांचा शाल श्रीफळ द्वारे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी सत्कार केला तर राज्यपालांच्या सुंदर चित्रकृतीची आकर्षक फ्रेम प्रदेश महामंत्री सुशिल टाटीया यांचे हस्ते महामहिम यांना भेट म्हणून देण्यात आली. स्वतःच्ये हुबेहूब चित्र बघून कोशियारी थक्क झाले आणि कलेला मनसोक्त दाद दिली.


महासंघाच्या विविध कामकाजाचा प्रामुख्याने कॅन्सर डिटेक्शन बस, महिला आधार अनुष्ठान, पूरग्रस्तांसाठी केलेल्या कामांचे राज्यपालांनी तोंड भरून कौतुक केले व सहकार्याची भावना व्यक्त केली. महासंघाची कार्यपुस्तिका श्री चोपडा यांच्या हस्ते भेट देण्यात आली.
सदरच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा लवकरच जाहीर करण्यात येणार असून जैन समाजातील तमाम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष ललित गाँधी, राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री सुशिल टाटीया आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]