महाराष्ट्र 9

मुकबधीर शाळेतर्फे मतदार जनजागृती रॅली

[espro-slider id=13780]

मुकबधीर शाळेतर्फे मतदार जनजागृती रॅली


चोपडा(प्रतिनिधी)शहरातील स्व. तुळसाआई बहुउद्देशीय संस्था संचलित मुकबधीर शाळेतर्फे मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवण्यासाठी मतदार जनजागृती रॅली नुकतीच काढण्यात आले.
मतदार जनजागृती रॅली ला हिरवा झेंडा संस्थेचे प्रणेते भावलाल पाकळे यांनी दाखवून रॅली ला सुरुवात झाली रॅली ला सुरुवात धनवाडी रस्त्यावरील मुकबधीर शाळेपासून सुरवात होऊन शाळेतील परिसरातील प्रसाद नगर,बोरोले नगर,पंकज नगर,संजीवनी नगर,महालक्ष्मी नगर येथून शाळेत सांगता झाली.मतदानबाबत उधबोधक फलक धरीत मुकबधीर मुलामुलीनी जनजागृती केली
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सौ.लिलाताई पाकळे,माजी उपसभापती देवानंद शिंदे सर,शाळेचे मुख्याध्यापक अविनाश वाळकीकर आदी उपस्थित होते.शाळेतील शिक्षक रविंद्र भवराळे,सुरेखा पाटील,नम्रता धनगर,एकनाथ धनगर,राजेंद्र पाटील,भिमराव धनगर यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]