सर्व पक्षीय नेत्यांची शक्ती ऐकवटल्याने प्रभाकर आप्पाचा विजय निश्चित

चोपडा ( प्रतिनिधी ) — आज चोपडा शहरात भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रभाकर आप्पा यांची भव्य प्रचार रॅलीत सर्व पक्षिय नेत्यांची शक्ती एकवटल्याने आजच विजय निश्चित झालेला दिसत आहे या रॅलीत चोपड्याचे माजी आमदार कैलास बापू पाटील, भाजपाचे चंद्रशेखर युवराज पाटील, भाजपाचे मुलुख मैदान तोफ शांताराम आबा पाटील, शेतकी संघाचे माजी चेअरमन हिम्मतसिंग पाटील ,माजी जि.प.सदस्य शांताराम सपकाळे , शिवसेनेच्या नेत्या सौ इंदिराताई पाटील , व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन प्रल्हाद पाटील, माजी पंचायत सभापती रमेश महाजन, भाजपाचे प्रदीप पाटील,, डी. पी.साळूखे, माजी पंचायत समितीचे उपसभापती मुरलीधर बाविस्कर, सीताराम गोवा देवराज, सुभाष लोटन कोळी , सुनील पाटील, नगरसेवक गंजेंद्र जैस्वाल, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, यांच्या सोबत अनेक दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.








