

चोपडा(प्रतिनिधी)-चोपडा विधानसभा मतदारसंघात सध्या राजकिय वातावरण चांगलेच तापले असून अपक्ष उमेदवार सौ.माधुरीताई पाटील व किशोर आप्पा पाटील यांच्या संघर्षमय राजकारणाची तालुक्यात चर्चा होताना दिसत आहे.या पती पत्नीच्या जोडीने राजकीय क्षेत्रात खूपच असा संघर्ष केला आहे.किशोर आप्पा पाटील हे जळगाव महानगरपालिकेचे सतत २२ वर्ष नगरसेवक होते तर महापौर पद देखील त्यांनी भूषविले आहे.असे असतांना देखील त्यांनी राजकारणात डाग लागू दिला नाही विकास कामे करून त्यांनी आपल्या पदाचा फायदा जनतेसाठी केला.सौ. माधुरीताई पाटील यांनी देखील महिला सक्षमीकरण, बचत गट या माध्यमातून जनतेशी नाळ जोडली अत्यंत संघर्ष करून ते लोककल्याणासाठी आज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत तालुक्यातीलच नाही तर जिल्ह्यातील मीडिया माधुरीताई पाटील यांच्या निवडणुकीवर लक्ष ठेऊन आहे. त्यांनी स्वीकारलेल्या आव्हानांची आणि लोकांनी स्वतः हुन हातात घेतलेल्या निवडणूकीची चर्चा आज तालुक्यात होताना दिसत आहे.किशोर आप्पा व माधुरीताई यांचे सामाजिक काम, त्यांची असलेली दूरदृष्टी, वेळोवेळी ते मांडत असलेली अभ्यासू मते पाहून चोपड्याचे लोक नशीबवान आहेत असं मनोमन वाटते.खरं तर त्यांचा अभ्यासू नेतृत्वाचा फायदा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्यांना एक वेळेस चोपडा मतदार संघासाठी काम करण्याची संधी मिळेल. म्हणून जनतेने त्यांना या संघर्षसाठी विजय मिळवून देणे जनतेच्या भल्याचे राहील.

आज जो कोणी माधुरीताई यांना मतदान करेल तो उद्याच्या काळात स्वतःला नशीबवान समजणार हे सत्य आहे तालुक्यात सुसंस्कृत राजकारण करणारा नेता म्हणजेच माधुरीताई व किशोर आप्पा यांना आम्ही निवडून देऊन राष्ट्रहिताचे काम केल्याचा अभिमान वाटेल असे व्हिजन या जोडीकडे आहे. याच नव्या सुसंस्कृत राजकारणाची सुरुवात एका उदाहरणातून दिसून येते ते म्हणजे “मी एकही थेंब दारू वाटणार नाही. कारण मला लोकांची कुटुंब उभी करायची आहेत, त्यांना चांगल्या प्रकारे स्थिरस्थावर होताना पाहायचं आहे. त्यानां चुकीच्या मार्गाला न लावता त्यांना योग्य दिशा मला द्यायची आहे. असं भर सभेत ठणकावून व्हिजन सांगताना किशोर आप्पा व माधुरी ताई दिसतात” अनेकांनी तालुक्यातील तरुणांना सट्टाच्या पिढीवर,दारूच्या अड्ड्यावर, सोरटच्या गाडीवर रोजगार देऊन त्यांना दिशाहीन केले परंतु याच तरुणांना त्या वाम मार्गातून बाहेर काढून त्यांना स्वतःचा उद्योग,व्यवसायसाठी प्रोत्साहन देण्याचे काम माझं असेल असेही ते आपल्या भाषणात सांगतात याच उदाहरणातून आम्हाला तालुक्यात नव्या पर्वाची सुरुवात ही चोपडा मधून होताना दिसत आहे.





