दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथका कडून अटक

चोपडा ( प्रतिनिधी )—–
अडावद (ता.चोपडा) पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी नाचण्या
सुमाऱ्या पावरा हा गेल्या दोन वर्षांपासून फरार होता.पोलीस त्याचा कसून शोध घेत होते परंतु तो कुठेच मिळून येत नव्हता.गोपनीय माहिती च्या आधारे सापळा रचून आरोपीस जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथका कडून नुकतीच अटक करण्यात आली. अडावद जवळील पांढरी येथील रहिवाशी
नाचण्या सुमाऱ्या पावरा ( वय-३२ ) याचेवर
अडावद पोलीस स्टेशनला भाग-५ गुरनं.१० / २०१७ भादवि कलम ३२४ प्रमाणे मारहाणीचा गुन्हा दाखल होता.तेंव्हा पासून तो फरार होता. दरम्यान स्थानिक पोलीस त्याचा कसून शोध घेत होते परंतु तो कुठेच मिळून येत नव्हता. वरील गुन्हयातील आरोपी गावात आला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या एएसआय राजेंद्र पाटील,पो.हे.कॉ.
नारायण पाटील,रामचंद्र बोरसे,पो.ना.मनोज
दुसाने,प्रवीण हिवराळे,दीपक पाटील यांच्या
पथकाने सापळा रचून आरोपी नाचण्या सुमाऱ्या पावरा रा.पांढरी (अडावद ) यास अटक करून अडावद पोलिसांच्या स्वाधीन केले.





