महाराष्ट्र 9

चोपड्यात रा.स्व.संघाचा विजयादशमी उत्सव

[espro-slider id=13780]

चोपड्यात आज रा.स्व.संघाचा विजयादशमी उत्सव


चोपडा – येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज दि.८ रोजी सकाळी साडेसात वाजता बापू डेअरीचे संचालक बापू महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी प्रमुख वक्ते भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री चंदन सर्जेराव पाटील हे बौध्दीकातून मार्गदर्शन करणार आहेत.उत्सव माळी समाज मंगल कार्यालय खाईवाडा (पाटील गढी) येथे होणार आहे.यावेळी शस्त्रपुजनही करण्यात येणार आहे.तसेच उत्सवानंतर शहरातील विविध भागातून पथसंचलन काढण्यात येणार असून त्याचा समारोप नवग्रह मंदिर, शेतपुरा येथे करण्यात येणार आहे.यावेळी स्वयंसेवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन तालुका संघचालक डॅा.मनोज विसावे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]