महाराष्ट्र 9

चोपड्यात कत्तलीसाठी बांधलेले दीड लाखाच्या गोऱ्हयांची पोलिसांनी केली सुटका ; अज्ञात
आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

[espro-slider id=13780]

चोपड्यात कत्तलीसाठी बांधलेले दीड लाखाच्या
गोऱ्हयांची पोलिसांनी केली सुटका ; अज्ञात
आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

चोपडा ( प्रतिनिधी )—–


कत्तलीच्या उद्देशाने बारा गोऱ्हे खरेदी करून
एका अज्ञात आरोपीने बांधून ठेवल्याची गुप्त
माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाल्याने
पोलिसांनी घटना स्थळी जाऊन दीड लाख रुपये
किंमतीचे १२ गोऱ्हे जप्त करून त्यांची वेले येथील आश्रमात सुखरूप रवानगी केल्याची घटना चोपड्यात घडली.या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शहरातील एका अज्ञात व्यापाऱ्याने बारा गोऱ्हे
खरेदी करून कत्तलीच्या उद्देशाने शहरातील
आशा टॉकीज जवळ असलेल्या नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला नाल्यालगत
मदरसा जवळील मोकळ्या जागेत बाभळीच्या
झाडाखाली बेवारासपणे बारा गोऱ्हे बांधलेले
असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना खबऱ्या
कडून मिळाली.त्या प्रमाणे सदर बातमीची खातर
जमा करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी त्यांना बातमी प्रमाणे बारा गोऱ्हे झाडा
खाली बांधलेले आढळून आल्याने मुद्देमाल जप्त
ची कारवाई करून सर्व बारा गोऱ्हेची वेले येथील
आश्रमात रवानगी केली आहे.या प्रकरणी पो.ना.विलेश
सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी
संरक्षण अधिनियम १९७६ चे २०१५ पर्यंत सुधारणे सह कलम ५ अ, ५ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास
पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.संतोष पारधी करीत आहेत.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]