महाराष्ट्र 9

रोटरी क्लब चोपडा तर्फे जि.प.शाळा साखर कारखाना चहार्डी येथे ट्यूबवेलचे लोकार्पण

[espro-slider id=13780]

रोटरी क्लब चोपडा तर्फे जि.प.शाळा साखर कारखाना चहार्डी येथे ट्यूबवेलचे लोकार्पण
चोपडा प्रतिनिधी :—


जिल्हा परिषद जि प शाळा साखर कारखाना चहार्डी येथे चार वर्षापासून साखर कारखाना बंद असल्याने वीज आणि पाण्याची अजिबात सुविधा नव्हती अशा परिस्थितीत पिण्यासाठी,शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी तसेच वृक्षरोपण इत्यादी कामासाठी पाण्याअभावी खूप हाल होते, जल मिशन अंतर्गत देखील जवळपास ग्रामपंचायतीची पाईपलाईन उपलब्ध नसल्याने पाण्याची व्यवस्था झाली नाही ही व्यथा माननीय गटविकास अधिकारी, माननीय गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य यांना वेळोवेळी सांगितले शेवटी त्यांनी दिलेल्या आश्वासना प्रमाणे रोटरी क्लब चोपडा चे अध्यक्ष नितीन अहिरराव यांच्याशी संपर्क साधून या शाळेसाठी कूपनलिका साठी उपलब्ध करून दिली व त्यानुसार आज दिनांक 29 जून 2019 रोजी रोटरी क्लब चोपडा तर्फे शाळेत बोरिंग करण्यात आली.साधारपणे ३०० ते ४६५ फुटावर पाणी लागले आहे.

मुख्याध्यापक श्री तुषार पाटील यांनी रोटरी मार्फत झालेल्या या मदतीमुळे शाळेला पाण्याची सोय होऊन शाळेचा कायम स्वरुपी पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे त्यांनी रोटरी क्लब चोपडा व त्यांचे सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.


सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. श्री घनश्याम निंबाजी पाटील माजी चेअरमन चो.सा.का. यांनी पूजन व फलकाचे अनावरण करून कामाची सुरवात् केली, आपल्या भाषणात रोटरी करीत असलेल्या सेवा कार्याचे कौतुक केले.


प्रमुख पाहुणे सौ. प्रतिभा बाबूराव पाटिल सभापति पं. स. चोपडा, श्री सूर्यकांत गोविंद खैरनार उपसभापति पं. स. चोपडा,श्री अतुल नाना ठाकरे चेअरमन चो.सा.का. ,प्रा सौ. डॉ नीलम पाटिल जी.प.सदस्या ,सौ. मालुताई रायसिंग प. स. सदस्या ,सौ कल्पना पाटिल प. स.सदस्या,श्री भरत कोसोदे बी.डि.ओ. प. स. चोपडा, सौ. भावना भोसले मॅडम गट शिक्षण अधिकारी प. स. चोपडा. आदी उपस्थित होते. रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव या यांनी आपल्या प्रस्तावनेत प्रकल्पाबाबत माहिती दिली तर सूत्रसंचालन मा.सचिव रुपेश पाटिल यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी रोटरीचे महेंद्र बोरसे,प्रफुल्ल भाई गुजराथी,संजीव भाई गुजराथी,अर्प्रित अग्रवाल, चेतन टाटिया, चंद्रशेखर साखरे,विलास कोष्टी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक तुषार पाटील व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]