महाराष्ट्र 9

अंत्ययात्रेसाठी जमलेल्या आदिवासी महिलांवर काळाचा घात भिंत कोसळल्याने एक ठार तर सहा जखमी चोपडा तालुक्यातील वरगव्हाणची घटना

[espro-slider id=13780]

अंत्ययात्रेसाठी जमलेल्या आदिवासी महिलांवर काळाचा घात भिंत कोसळल्याने एक ठार तर सहा जखमी चोपडा तालुक्यातील वरगव्हाणची घटना

वरगव्हाणची घटना : भिंत कोसळल्याने सहा महिला जखमी, दुर्दैवी घटनेने शोककळा


चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथे
अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या महिलांवरच काळाने घाला घातला. ओट्यावर बसलेल्या असताना भिंत कोसळून एक आदिवासी महिला ठार तर सहा महिला जखमी झाल्याची घटना वरगव्हाण येथे २९ रोजी घडली.

पुरुष मंडळी प्रेत घेऊन स्मशानभूमीत गेले होते. समाज प्रवेप्रमाणे सर्व महिला गावहाळ जवळ हातपाय धुण्यासाठी गेल्या असताना शेजारीच असलेल्या एका बांधकामाच्या ओट्यावर काही महिला बसल्या क्रूर काळाने या गरीब आदिवासी महिलांवर आपला डाव साधत ओठ्यासह भिंत कोसळली. व एक महिला जागीच ठार झाली.होते. मयत महिलेचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी पुरुष मंडळी घेऊन गेले होते. इकडे सर्व महिला समाज प्रथेप्रमाणे संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गावहाळवर गेल्या व काही महीला शेजारीच बांधकाम सुरु असलेल्या भिकन दमड्या पावस यांच्या ओट्यावर बसल्या होत्या. त्यावेळी अचानक ओट्यासह घराची भिंत पडली व क्षणात होत्याचे नव्हते झाले. यात गावातीलच जेलीबाई परशुराम बारेला ही अपंग महिला जागीच ठार झाली तर त्यांच्यासोबत लालबाई मारसिंग पावरा, कुसुमबाई नरसिंग पावरा, कालुबाई प्रताप बारेला बाकलीबाई भाईदास पावस, जसुबाई सेवा पावरा, सायकाबाई भायला पावरा या गंभीर जखमी झाल्या.

घटना घडली तेव्हा सर्व पुरुष अंत्ययात्रेत गेले होते. यावेळी गावाचे सरपंच भूषण पाटील यांनी स्वताच्या गाडीत जखमींना टाकत धानोरा
प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले तेथे एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. आरोग्य सेविका भिकूबाई बोदडे व भारती सोनवणे यांनी उपचार करत जखमींना अधिक उपचारासाठी नळगावी रवाना केले.

याठिकाणी पं. स.चे उपसभापती सुर्यकांत खैरनार यांनी भेट दिली तर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, तलाठी सरोवर तडवी यांनी भेट दिली तर अडावद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनीही आपले सहकारी पाठवत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]