महाराष्ट्र 9

रोटरी क्लब चोपडा तर्फे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्याहस्ते ८ शिलाई मशीनचे गरजू महिलांना वाटप
प्रांतपाल शब्बीर शाकीर यांनी चोपडा भेटीत केले कौतुक.

[espro-slider id=13780]

रोटरी क्लब चोपडा तर्फे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्याहस्ते ८ शिलाई मशीनचे गरजू महिलांना वाटप
प्रांतपाल शब्बीर शाकीर यांनी चोपडा भेटीत केले कौतुक.
चोपडा वार्ताहर.


चोपडा रोटरी क्लब सातत्याने आपली सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात या वर्षी सुध्दा विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे.करोना च्या दुसऱ्या लाटेत कुटुंब चे कुटुंब उद्ध्वस्त झाले. करोना च्या भयानक लाटेत कुटुंबातील करता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घरातील महिलेवर आली. साधारण परिस्थिती मधून कसाबसा आपला घर परिवार चालवित होती.

अश्या कर्तबगार आणि होतकरू महिलेंना बळ देण्यासाठी व त्यांना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडा च्या वतीने अश्या गरजू व निराधार महिलेंना मोफत शिलाई मशीन भेट देऊन त्यांना स्वावलंबी होण्यास रोटरीने माणुसकीचा व मदतीचा हात दिला. या वर्षी रोटरीतर्फे 5000 मास्क चे मोफत वाटप, तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन चे लोकार्पण,आदिवासी पाड्यांवर कपडे वाटप,आर्थोपेडिक लायब्ररी सुरू केली,अशा अनेक विविध सेवा कार्य करीत आहे.


प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्या शुभहस्ते लिलाबाई शिंदे,मनीषा प्रदीप पाटील, विद्याबाई गुलाब मराठे, छाया प्रताप मराठे, मायाबाई भिकन बोरसे, नेहा जितेंद्र पालीवाल, रत्‍नाबाई नवल साळुंखे, अर्चना प्रकाश महाजन अश्या आठ गरजू महिलांना शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले फक्त शिलाई मशीन देऊन न थांबता रोटरी क्लब तर्फे त्यांना मोफत प्रशिक्षण देणार आहेत ज्यातून त्यांना स्वयम् रोजगार निर्मिती होईल असे रोटरी अध्यक्ष यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितले.


सदर कार्यक्रमासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट 3030चे प्रांतपाल शब्बीर शाकीर,डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी टॉबी भगवागर ,सह प्रांतपाल योगेश भोळे,कॉन्फरन्स चेअर अतुल शहा, फर्स्ट लेडी जुमानाजी,रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव,मा.सचिव ॲड.रुपेश पाटील मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना, रोटरी प्रार्थना व पोलारीस यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम पाटील सर प्रस्तावना रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी वर्षभर केलेल्या कार्याची माहिती दिली, आभार प्रदर्शन मा.सचिव ॲड.रुपेश पाटील यांनी केले.
कार्यक्रमासाठी पत्रकार बंधू व रोटरीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]