महाराष्ट्र 9

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सह  35 लाखाचा मुद्देमाल परराज्यातुन केला जप्त , चोपडा शहर पोलीस स्टेशनची कारावाई

[espro-slider id=13780]
जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस नाईक संतोष पारधी,योगेश पालवे,शेषराव तोरे,ज्ञानेश्वर जवागे,विलेश सोनवणे, इतर पोलीस कर्मचारी व होमगार्ड

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सह  35 लाखाचा मुद्देमाल परराज्यातुन केला जप्त , चोपडा शहर पोलीस स्टेशनची कारावाई


चोपडा (प्रतिनिधी)
चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील अपहार झालेल्या दोन बोअरवेलच्या ट्रक मध्यप्रदेश राज्यातील शिवनी जिल्ह्यातील चिखली या गावातुन अत्यंत शिताफीने जप्त करुन संबंधित गुन्ह्यातील आरोपीस चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या तपास टिमने अटक करुन आणले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,चोपडा येथील सहयोग कॉलनी येथील रहिवाशी असलेले बोअरवेल व्यवसायिक वल्लभ पटेल यांच्याकडून आरोपी राजाराम चंद्रवंशी याने मौखिक करारानुसार मासिक भाडेतत्वावर बोअरवेलच्या दोन ट्रक व्यवसायाकरीता नेल्या.मात्र झालेल्या मौखिक करारानुसार आरोपीने फिर्यादी वल्लभ पटेल यांना कुठल्याही प्रकारचे देणे केले नाही.म्हणुन फिर्यादी वल्लभ पटेल यांनी आरोपी राजाराम चंद्रवंशी यास संपर्क केला असता तो टाळाटाळ करीत होता.

असे निदर्शनास आले असता फिर्यादी वल्लभ पटेल हे स्वतः आरोपीच्या मध्यप्रदेश येथील राहत्या घरी गेले असता त्याने ठरलेले भाडे व फिर्यादीच्या मालकीच्या असलेल्या दोन बोअरवेल ट्रक देण्यास नकार दिला.व उलट माझेच तुमच्यावर पैसे निघतात असे सांगुन परतवुन लावले.


त्यामुळे फिर्यादी यांनी सदर बाब हि चोपडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या निदार्शनास आणुन दिली.व दि.15/06/2021 रोजी गुरन 209/2021 भादवि कलम 406,420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.व तपास पोलीस नाईक संतोष पारधी यांच्याकडे देण्यात आला.या तपासकामी शहर पोलीस स्टेशनची टिम मध्यप्रदेश येथील शिवनी जिल्ह्यातील चिखली या गावी जाऊन आरोपी राजाराम चंद्रवंशी व अपहार झालेल्या दोन बोअरवेल ट्रक असा एकुण 35 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीला दोन दिवसाच्या ट्रांझिड रिमांडनंतर चोपडा येथे आणण्यात आले.आता आरोपीला दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली असुन तो चोपडा येथील जेलमध्ये आहे.


सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक साचिन गोरे व चोपडा भाग पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सदर गुन्ह्याचे तपासाधिकारी पोलीस नाईक संतोष पारधी तसेच पोलीस नाईक/543 योगेश पालवे ,पो.काँ./1576 सुभाष सपकाळ ,होमगार्ड स्वप्निल बाविस्कर व राहुल सावकारे यांनी केली.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]