महाराष्ट्र आशा-गटप्रवर्तक कर्मचारी संपाच्या मागण्या मान्य होई पर्यंत काम बंद ठेवण्याचा आशांचा मोर्चाद्वारे ईशारा.. *
चोपडा प्रतिनिधी —

महाराष्ट्र राज्यातील ६७ हजार आशा स्वयंसेविका व 3 हजार गटप्रवर्तक १५ जूनपा सून बेमुदत संपावर आहेत.
त्यांना अत्यंत कमी मानधन मिळते. त्यांना कोरोना संबंधित कामासाठी दररोज ८ तास काम करावे लागते. त्या अत्यंत जोखमीचे व जबाबदारीचे काम करतात. महाराष्ट्र सरकार त्यांना वेठविगारासारखे वागवित आहे. त्यांना योग्य किमान वेतन व कोरोना संबंधित कामासाठी योग्य भत्ता मिळाला पाहिजे अशा विविध मागण्या आहेत.

या संदर्भात सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांशी ,कृती समितीच्या नेत्याशी वेळोवेळी सविस्तर चर्चा झाली होती. आशा व गटप्रवर्तक या आरोग्य खात्याचा कणा आहेत. त्या आघाडीवरच्या योध्या आहेत, त्यांच्याबद्दल सरकारला आदर आहे, असे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री महोदय सांगतात. परंतु अशा सहानु भूतीने पोट भरणार नाही , आशाना १८००० व गटप्रवर्तक यांना २१००० वेतन मिळावे , विमा कवच पत्रकात आशांचा उल्लेख करावा , कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता मिळावा , चोपडे शहरात गटप्रवर्तक भरा , थकीत आरोग्य वर्धीनी मोबदला मिळावा , आरोग्य खात्यात रिक्त जागी ५० टक्के आरक्षण द्यावे , आशा गट प्रवर्तक वरील विना मोबदला खाते ,बाह्य कामे लादू नका ह्या मागण्यांसाठी ७ दिवसापासून आशा व गटप्रवर्तक यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

चोपडा तालुक्यातील व शहरातील २०० अशांनी चोपडा नगरपालिके पासून तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालयापर्यंत प्रचंड मोर्चा काढून मागण्यांवर विचार करेपर्यंत आरोग्य खात्याच्या कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तालुका अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

त्यावेळी शिष्टमंडळाने आशांना कबूल केलेला मोबाईल द्यावा, सायकल जाहीर केल्याप्रमाणे सायकल ऐवजी स्कुटी द्यावी ,शहरी भागातील आशा गटप्रवर्तक नियुक्त कराव्यात , त्यावेळी डॉ प्रदीप लासूरकर यांनी प्रत्येक पी एच सी ला आशांच्या प्रश्नावर मिटिंग बोलवून त्यांच्या समस्या सोबत तसेच नगरपालिका क्षेत्रातील आशाची देखील मीटिंग लावू असे आश्वासन दिले व तालुका कार्यालयाने केलेली कार्यवाहीचे पत्र दिले.. डॉ प्रदीप लासूरकर यांनी चोपडे तालुक्यातील आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका व शिक्षक यांचे” माझे कुटुंब – माझी जबाबदारी” चा मोबदला चोखपणे वाटप केला म्हणून त्यांचे युनियन तर्फे आभार मानण्यात आले. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ अमृतराव महाजन यांचे व तालुकाध्यक्ष मीनाक्षी सोनवणे,सचिव वंदना पाटील , शालिनी पाटील यांचे नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात सर्व श्रीमती विद्यादेवी कोळी शारदा माळी ,सुरेखा कोळी. नूतन वाघ, संगीता पाटील, छाया पाटील, निता पाटील, ललिता भादले, शहर पदाधिकारी पल्लवी सोनवणे, ज्योती सोनवणे , मुक्ता माळी, आरती कपुरे ,योगिता मिस्त्री,सुरेखा पाटील तसेच मीना चौधरी ,रत्ना शिरसाठ ,सुरेखा महाजन, रींकू बारेला आदी उपस्थित होत्या .






