महाराष्ट्र 9

जमिनीत उतरलेल्या विजप्रवाहचा शाॅक लागून दोन म्हशींचा मृत्यू…
वायरमनसह तरुण बचावला…
चोपडा तालुक्यातील मोहरद येथील घटना.

[espro-slider id=13780]

जमिनीत उतरलेल्या विजप्रवाहचा शाॅक लागून दोन म्हशींचा मृत्यू…
वायरमनसह तरुण बचावला…
चोपडा तालुक्यातील मोहरद येथील घटना.

चोपडा प्रतिनिधी :—


तालुक्यातील मोहरद येथे गावाला विज पुरवठा करणाऱ्या डीपीतुन जमिनीत विज प्रवाह उतरून शाॅक लागून दोन म्हशींचा मृत्यू झाला. तर म्हशी घेऊन जाणारा तरुण थोडक्यात बचावला तर घटनास्थळी आलेला कंत्राटी वायरमन यालाही विजेचा धक्का लागला मात्र तो दुर झाल्याने तोही बचावल्याची धक्कादायक घटना सकाळी साडेआठ वाजता घडली.
याबाबत सविस्तर असे की , मोहरद येथे गावाला सिंगल फेज विजपुरवठा करण्यासाठी दोन डिपी आहेत.त्यापैकी गावहाळ जवळ असलेल्या १ नंबर डिपीवर आर्थिंगची वायर तुटून डीपीच्या जवळपास १० ते १५ फुटाच्या परिसरातील जमिनीत विजेचा प्रवाह उतरला होता.


याच वेळी हसीना गुलशेर तडवी या शेतमजूरी करणाऱ्या महिलेच्या दोन म्हशी त्यांचा मुलगा रसूल गुलशेर तडवी हा घेऊन हाळकुंडाजवळ पाणी पाजण्यासाठी आला असता अचानक म्हशी डीपीच्या दिशेने ओढल्या गेल्या व जोरदार विजेचा झटका लागून मृत झाल्या.


म्हैशी हाकणारा तरुण व वायरमन बवाचले . डोळ्या समोर आपल्या म्हशी डिपीकडे ओढल्या जाऊन तरफडत असतांना त्यांना हाकलून नेनारा तरुण रसूल तडवी याने त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही विजेचा जोरदार धक्का लागून तो बाजूला फेकला गेला.व सुदैवाने तो बचावला . सदरील घटना गावातीलच कंत्राटी वायरमन सलीम तडवी याला माहीत होताच तोही घटनास्थळी येवून डिपी बंद करण्यासाठी जात असतांना त्यालाही विजेचा धक्का लागला.तो वेळीस समयसुचकता दाखवत बाजूला झाल्याने मोठी दुदैवी घटना टळली .

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]