महाराष्ट्र 9

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग संस्कृती जोपासणे आवश्यक – आदित्य पाटील

[espro-slider id=13780]

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग संस्कृती जोपासणे आवश्यक – आदित्य पाटील

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ते २१ जून या कालावधीमध्ये ऑनलाइन राष्ट्रीय योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय योग कार्यशाळेच्या प्रथम दिवशी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कार्यकारी मंडळाचे सदस्य व सुझू ऍग्रो प्रॉडक्ट कंपनीचे कार्यकारी संचालक श्री. आदित्य संदीप पाटील हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. धनाजी नाना महाविद्यालयातील क्रीडा संचालक व योग शिक्षक डॉ. गोविंद मारतडे व महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यशाळेला संबोधित करतांना श्री. आदित्य पाटील म्हणाले की, योग व प्राणायाम ही भारतीय संस्कृतीला लाभलेली एक मोठी देणगी आहे. दैनंदिन धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात योग व प्राणायाम याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संतुलित उत्तम आहार व दैनंदिन योग साधना मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेलेले आहे. योग संस्कृती हीच मानवाला या काळात शारीरिक व मानसिक दृष्ट्या सशक्त ठेवणार आहे. योग प्रशिक्षक डॉ. गोविंद मारतडे यांनी पावर पॉइंट सादरीकरणाद्वारा योग साधनेचा प्राचीन इतिहास उलगडून दाखविला. ऐतिहासिक काळापासून तर आज तागायत कशा पद्धतीने योग संस्कृती जोपासली गेली आहे याचे विविध उदाहरणाद्वारे विश्लेषण केले. योग संस्कृती व आहार संस्कृती याबद्दल त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रा. डॉ. ए. एल. चौधरी यांनी संस्था, महाविद्यालय, शिक्षण प्रणाली, योगाचे महत्व व राष्ट्रीय कार्यशाळा आयोजनामागील पार्श्वभूमी आपल्या प्रास्ताविक मनोगतातून मांडली. पाच दिवसीय राष्ट्रीय योग कार्यशाळेत प्रा. डॉ. गोविंद मारतडे, डॉ. ज्योती वाघ, प्राचार्य डॉ. एस. एम. कोटे हे सहभागी सदस्यांना योग व प्राणायाम याविषयी माहिती व प्रशिक्षण देणार आहेत.


दिनांक २१ जून अर्थात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी राष्ट्रीय योग कार्यशाळेचा समारोप होणार आहे. सदर समारोप प्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून औरंगाबाद येथील प्राचार्य डॉ. एस. एम. कोटे उपस्थिती देणार आहेत. या राष्ट्रीय योग कार्यशाळेत देशभरातील सतरा राज्यांमधून ४५० पेक्षा अधिक सदस्य सहभागी झालेले आहेत. राष्ट्रीय योग कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. व्ही. टी. पाटील, डॉ. के. एन. सोनवणे, प्रा. एन. एस. कोल्हे, रजिस्ट्रार श्री. डी. एम. पाटील व आयोजन समितीचे सदस्य राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री. डी. पी. सपकाळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ, क्रीडा संचालिका सौ. क्रांती क्षीरसागर व तांत्रिक विभाग प्रमुख डॉ. लालचंद पटले, डॉ. पी. के. लभाणे परिश्रम घेत आहेत.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]