महाराष्ट्र 9

चोपडा पंचायत समिती मार्फत महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत ई- गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न #तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध

[espro-slider id=13780]

चोपडा पंचायत समिती मार्फत महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत ई- गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न #तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध .. चोपडा प्रतिनिधी :–

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी दिनांक २० नोव्हेंबर ते ५ जून या कालावधीत राज्यात महा आवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले होते .सदर अभियानांतर्गत ई गृह प्रवेश कार्यक्रम चोपडा पंचायत समितीच्या सभागृहात प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना सभापती प्रतिभा पाटील व उपसभापती सूर्यकांत खैरनार व गटविकास अधिकारी बी एस कोसोदे यांच्या हस्ते घरांची चावी देऊन ई गृहप्रवेशचे वाटप करण्यात आले तसेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीना करण्यात येणार आहे .प्रातिनिधिक स्वरूपात ९ ग्रामपंचायतींना ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे वाटप करण्यात आले त्यात मामलदे ,कठोरा , वेळोदे ,चांदसनी, रुखणखेडे ,वेले ,बोरअजटी, वराड , नागलवाडी या ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आले तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण डेमो हाऊसचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .

सदर कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा पाटील, उपसभापती सुर्यकांत खैरनार ,माजी सभापती आत्माराम म्हाळके ,पंचायत समिती सदस्य भूषण भिल्ल, गट विकास अधिकारी बी एस कोसोदे , जे पी पाटील , नंदकिशोर सोनवणे , प्रवीण शिंदे , चंद्रकांत बडगुजर यांसह आदी उपस्थित होते ..

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]