चोसाकाचा-बुलढाणा अर्बन बँकेची २७ कोटीत
तडजोड ; भाडेतत्वावर देण्यासाठी प्रक्रिया सुरू
चेअरमन अतुल ठाकरे

चोपडा ( प्रतिनिधी )—–
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना व
बुलढाणा अर्बन पतसंस्था यांच्यातील थकीत कर्जाचा तिढा सोडविण्यात सर्वपक्षीय नेत्यांच्या
प्रयत्नांना यश आले असून,त्यासाठी बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन राधेश्याम चांडक व अधिकारी वनटाईम सेटलमेंटची बोलणी
करण्यासाठी मंगळवारी चोपड्यात आले होते. बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे चोसाकाकडे ४७कोटी रुपये घेणे आहे.त्यावर सर्वपक्षीय नेते,संचालक मंडळ यांची संस्थापक चेअरमन राधेश्याम चांडक व अधिकारी यांचेशी थकीत कर्जाची वनटाईम सेटलमेंटची बोलणी होऊन,अखेर २७ कोटीत
यशस्वी तडजोड फायनल झाली.त्यामुळे चोसाका
भाडेतत्वावर देण्यासाठीचा मार्ग खुला झाला असून,पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी
माहिती चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे यांनी
आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत बोलतांना
दिली.

बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे चोसाकाकडे कर्जा
पोटी ४७ कोटी रुपये घेणे थकीत आहेत.कर्जाचा कारखाना भाडेतत्वावर देण्यास अडसर येत होता. याबाबत सर्वपक्षीय नेते व चोसाका संचालक मंडळाचे वनटाईम सेटलमेंट करून तडजोडीसाठी बुलढाणा अर्बनचे संस्थापक चेअरमन राधेश्याम
चांडक यांचेशी बोलणी सुरू होती.परंतू एकरकमी तडजोडीची बोलणी निष्फळ ठरत होती.त्यासाठी
अंतिम बोलणी करण्यासाठी चेअरमन राधेश्याम चांडक यांचे शिष्टमंडळ आज दि.१५ जून रोजी दुपारी ३ वाजता चोपड्यात आले होते.यावेळी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित बैठकीला चोसाकाचे सर्वपक्षीय नेते तथा विधान सभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी,माजी आमदार कैलास पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अड.संदीप पाटील,भाजपचे जेष्ठनेते घनश्याम अग्रवाल तसेच चोसाकाचे माजी चेअरमन अड.घनश्याम पाटील,पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, बुलढाणा अर्बनचे
संस्थापक चेअरमन राधेश्याम चांडक, संचालक अनंत देशपांडे,विभागीय अधिकारी रमेश पवार,
कायदेशीर सल्लागार विशाल तोतला यांचेसह
चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे,व्हॉ.चेअरमन शशिकांत देवरे,संचालक आनंदराव रायसिंग,
प्रवीण गुजराथी,आत्माराम म्हाळके,विजय पाटील,प्रदीप पाटील,निलेश पाटील,सुनील महाजन,गोपाल धनगर,प्रभारी कार्यकारी संचालक अकबर पिंजारी उपस्थित होते. बैठकीत चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे यांनी कारखान्याची वस्तुस्थिती व भाडेतत्वावर

देण्यासाठी येणाऱ्या अडचणी मांडल्या.जेष्ठनेते
प्रा.अरुणभाई गुजराथी म्हणाले जिल्हा बँकेने
चोसाकाला कर्ज नाकारल्यानंतर कठीण प्रसंगात बुलढाणा अर्बन पतसंस्थेने आर्थिक सहाय्य करून मोठा आधार दिला.परंतू सध्या चोसाका
दोन वर्षांपासून बंद असून,आर्थिक अडचणीत आहे म्हणून थकीत कर्जाची वनटाईम सेटलमेंट
करून सहकार्य करावे असे सांगून चेअरमन राधेश्याम चांडक यांचे आभार मानले.बैठकीत थकीत कर्जा बाबत प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर
बुलढाणा अर्बनचे संस्थापक चेअरमन चांडक
यांनी चोसाकाकडील थकीत ४७ कोटी कर्जाची
वनटाईम सेटलमेंट करून एकरकमी परतफेड करणेसाठी चोसाकाने २७ कोटी रुपये द्यावे असा
निर्णय जाहीर केला.त्यांच्या निर्णयाचे सर्वपक्षीय
नेते व संचालक मंडळाने टाळ्या वाजून मान्यता
दिली.व्हॉ.चेअरमन शशिकांत देवरे यांनी आभार मानले.
