महाराष्ट्र 9

अमळनेरात अनिलदादांच्या शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

[espro-slider id=13780]

अमळनेरात अनिलदादांच्या शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल


अमळनेर(प्रतिनिधी)- अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील यांनी महाशक्ती प्रदर्शन करीत दिगग्ज नेत्यांच्या उपस्थित आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचंड असा जनसमुदाय त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यावेळी उपस्थित असल्याने अनिलदादा यांच्या घड्याळीला सुगीचे दिवस आले असल्याचे दिसून आले.भाजपकडून दोन वेळा विजयाची संधी हुकल्यानंतर अनिल भाईदास पाटील यांनी दि.१ ऑक्टोबर मंगळवार रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या शक्तिप्रदर्शनच्या गर्दीने आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची होईल असे दिसते. मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चांगला मुहूर्ताचा दिवस असल्याने अनिलदादा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी मंगळदेव ग्रह मंदिरात नारळ वाढवून शहारातील मुख्य रस्त्यावर शक्ती प्रदर्शन करीत अर्ज भरण्याच्या रॅलीला सुरवात केली.ढोलताशाच्या गजरात मतदार संघातील सुमारे ५ ते ७ हजार महिला, पुरुष या रॅलीत सहभागी झाले होते. अनिल दादा आगे बढो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो आदी घोषणांनी अमळनेर शहर दणाणून गेले होते.केवळ नामनिर्देशन नाही तर जणू विजयी रॅली आहे असे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,राष्ट्रवादीचे महीला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,माजी मंत्री सतिश अण्णा पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, गफ्फार मलिक, ग्रंथालय सेल प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, तिलोत्तमा पाटील, रिटा बाविस्कर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, बाळू पाटील, मुख्तार खाटीक, सचिन पाटील, विनोद कदम, सुनिल शिंपी, दर्पण वाघ,आदी उपस्थित होते.भाजपकडून दोन वेळा उमेदवारी करून अनिल दादा यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातावर बांधले.५ वर्ष मतदार संघातील हालचाली बारकाईने अभ्यास करून त्यांनी पुन्हा उभारी घेतलीे. अनिल दादा यांच्या रॅली मध्ये माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सहभागी होत गाण्यावर ठेका घेतला. साहेबराव दादा पाटील हे भाजपात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल दादा आणि भाजपाचे साहेबराव दादा यांच्या या अनोख्या राजकीय खेळीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत हे मात्र तेवढेच खरे! त्यामुळे साहेबराव पाटील हे भाजपचे उमेदवार शिरीष चौधरी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतांना त्यांच्या रॅलीत सहभागी होतील की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]