महाराष्ट्र 9

वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त केले अनाथाना अन्नदान ,
पुरण पोळी व आंब्याचा रस , अनाथ व वृद्धामध्ये आनंद

[espro-slider id=13780]

वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त केले अनाथाना अन्नदान ,
पुरण पोळी व आंब्याचा रस , अनाथ व वृद्धामध्ये आनंद
चोपडा प्रतिनिधी :–


अडावद ता चोपडा येथील प्रगतीशील शेतकरी कै एकनाथ उत्तमराव देशमुख यांचे गेल्या वर्षी दि ४ जून रोजी ऱ्हदयविकाराने निधन झाले होते . त्यांचा प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांचा मुलगा कुलदीप देशमुख , आई चित्राबाई देशमुख , सुन भावना देशमुख यांनी एकत्र येऊन चर्चा केली की , जर वडिलांचे पुण्यस्मरण घरी केले तर कोरोनामुळे आपल्या घरी या कार्याला कोणीच येणार नाही त्यापेक्षा सदर कार्यक्रम वेले येथील अनाथ आश्रम व मानव सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन अनाथाना गोड पदार्थ खाऊ घालण्याचा निर्णय घेण्यात आला.


त्यानुसार वेले येथील अनाथ व वृद्धांना आणि मानवसेवा तिर्थ येथील मनोरुग्णांना जेवण देऊन वडिलांची प्रथम पूण्यतिथी साजरी केली .
यावेळी वृद्धांना ,मनोरुग्णाना व अनाथांना पुरण पोळी व आंब्याच्या रस खाऊ घालण्यात आला .
कुलदिप देशमुख ,भावना देशमुख , चित्राबाई देशमुख , कमलबाई देशमुख यांल्या हस्ते गाईला व गजानन महाराज यांना नैवेदय देण्यात आले .
कुलदिप देशमुख यांनी संगितले की, दर वर्षी वडिलांची पूण्यतिथी निमित्त भोजन दिले जाईल .
यावेळी सुधीर देशमुख ,मोहित देशमुख यश पाटील अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील , निलेश चौधरी ,जितेंद्र चौधरी ईश्वर पाटील ,स्वप्नील पाटील , आत्माराम कोळी ,शोभा मोरे ,प्रणाली मोरे ,सोनू बाविस्कर, रोहिदास मोरे व उत्तम अहिरे अरुण मोरे व वृद्धाश्रमातील व मानवसेवा तिर्थ येथील कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]