चोपडा तालुक्यात विकास कामांचा झंझावात सुरूच : ४५ लाखांच्या कामाचे झाले भुमीपूजन
चोपडा प्रतिनिधी:-
चोपडा तालुक्यातील आमदार लताताई सोनवणे यांचा विविध विकासकामांचा झंझावात सुरूच आहे. विविध गावांमध्ये साठ लाखांच्या कामांचे भुमीपूजन करण्यात आले.

दि. ४ रोजी दुपारी ४ वाजता आडगाव, ता. चोपडा येथे आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विकासकाम अनुसूचित जाती / जमाती वस्तीला लागून असलेल्या नाल्याजवळ संरक्षण भिंत बांधणे रु. ५.०० लक्ष, कुरवेल, ता. चोपडा येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे रु. २५.०० लक्ष, तांदलवाडी ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे रु. ५.०० लक्ष व घाडवेल ता. चोपडा येथे आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विकासकाम पेव्हर ब्लॉक बसविणे रु. १०.०० लक्ष.

आडगाव ता. चोपडा येथे मागासवर्गीय वस्तीत नाल्यावर संरक्षण भिंत बांधणे रु. ५ लक्ष या विकासकामांचे भुमिपूजन रावेर लोकसभा संपर्क प्रमुख मा.विलासजी पारकर यांचे शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संपर्क प्रमुख चोपडा विधानसभा मा.सुधीरजी गडकरी व मा.ताईसो. सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार चोपडा विधानसभा) मा.आण्णासो.प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे (रावेर लोकसभा सहसंपर्क प्रमुख व माजी आमदार चोपडा विधानसभा) प्रमुख अतिथीच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना मा.विलासजी पारकर यांनी शिवसेनच्या कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केले.

तसेच प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे व आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या विकासकामांची विशेष प्रशंसा केली व प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांची रावेर लोकसभा सहसंपर्क प्रमुख नियुक्तीनिमित्त सत्कार करून पक्ष संघटनाच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपजिल्हा प्रमुख मुन्नाभाऊ पाटील, डॉ.मनोहर पाटील(जामनेर), प्रा.उत्तमराव सुरवाडे(भुसावळ) जिल्हा नियोजन समिती सदस्य मनोहर खैरनार, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, महिला तालुका प्रमुख मंगलाताई पाटील, जि.प.सदस्य हरीश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विकास पाटील, तालुका संघटक सुकलाल कोळी, युवासेना उपजिल्हाप्रमुख दिपक चौधरी, तालुका प्रमुख गोपाल चौधरी, सागर ओतारी, सुनील पाटील, सरपंच भूषण पाटील, नाना पाटील, निवृत्ती पाटील, बबलू पालीवाल, प्रवीण जैन, प्रशांत पाटील, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
