पंकज विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
चोपडा प्रतिनिधी :—-

येथील पंकज विद्यालयात जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधत वृक्षारोपण पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले , रिशान बोरोले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी एम व्ही पाटील (मुख्याध्यापक प्राथमिक विभाग ) ,व्ही आर पाटील ( मुख्याध्यापक माध्यमिक विभाग) नीता पाटील ( प्राचार्या पंकज इंग्लिश मीडियम स्कूल ) इत्यादी विभागप्रमुख उपस्थित होते .

जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशांमध्ये जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येतो .जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे. जागतिक पर्यावरण दिवसाचे महत्त्व स्पष्ट करताना पंकज बोरोले म्हणाले की , पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी संमेलने – चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणाऱ्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचवण्यासाठी विविध मोहीम राबवून जनजागृती करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले .
विद्यालयाच्या प्रांगणात वड , पिंपळ , निंब , चिंच इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली . यावेळी दिलीप बाविस्कर , विजय सोनवणे ,प्रमोद पाटील, कैलास बोरसे , विवेक भोळे , किशोर शिंगाणे , विजय पाटील , बाळू पाटील , वेलसिंग बारेला आदींनी परिश्रम घेतले…
