महाराष्ट्र 9

डॉक्टरांनी केला महिलेचा विनयभंग , चोपडा पोलिसात गुन्हा दाखल

[espro-slider id=13780]

डॉक्टरांनी केला महिलेचा विनयभंग , चोपडा पोलिसात गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी :—-


चोपडा शहरातील जुना यावल नाका भागात डॉ आबिद शेख गॅलेक्सी क्लिनिक या नावाने वैद्यकीय व्यवसाय करीत असतात . त्यांच्याकडे काझी मोहल्ला भागातील विवाहिता आपल्या तीन वर्षाच्या मुलाचा दात – दाढ दुखीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी घेऊन गेली असता गॅलेक्सी क्लिनिकचे संचालक डॉ आबिद शेख यांनी दरवाजा बंद करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना चोपडा शहरात घडली आहे .
सविस्तर वृत्त असे की , विवाहिता आपल्या कुटुंबात पती , सासू-सासरे , व तीन अपत्यासह काझी मोहल्ला भागात वास्तव्यास राहते . विवाहितेस अनुक्रमे दहा वर्ष , सहा वर्ष व तीन वर्ष असे तीन अपत्य आहेत . पैकी तीन वर्षाच्या नाहीद नावाच्या बाळास दात व दाढ दुखीचा त्रास होत असल्याकारणाने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील जुना यावल नाका भागातील डॉ आबिद शेख यांच्या गॅलेक्सी क्लिनिक मध्ये दात- दाढ दाखवण्यासाठी घेऊन गेली त्यावेळी डॉ आबिद शेख यांच्या क्लिनिकमध्ये इतर पेशंट व कंपाउंडर कोणीही नव्हते .


विवाहितेने डॉ आबिद शेख यांना मुलगा नाहीदची दात – दाढ दुखत आहे याबाबत सांगितले व मुलगा नाहीद यास तपासण्याच्या टेबलावर बसविले असता , डॉ आबिद शेख विवाहितेस म्हणाले की , मुलगा लहान आहेस , तुम्ही टेबलावर त्याला सोबत घेऊन बसा डॉक्टरच्या सांगण्यानुसार विवाहितेने मुलगा नाहीद यास आपल्या मांडीवर धरून टेबलावर बसली असता डॉ आबिद शेख यांनी दवाखान्याच्या दरवाजा लावला तेव्हा विवाहितीने विचारले की , दरवाजा का लावत आहात ? डॉ आबिद शेख यांनी सांगितले की , दरवाजातून उजेड येतो त्यामुळे दात चेक करता येत नाहीत असे सांगून डॉ आबिद शेख यांनी दरवाजा लावला व उजव्या हाताने मुलास चेक करत होते व विवाहितेच्या खांद्यावरून हात फिरवून तसेच विवाहितेच्या उजव्या पायावर हात फिरवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले सदर वेळी विवाहितीने डॉ आबिद शेख यांच्या हात झटकून आपण काय करीत आहात ? आपण मुलाला चेक करणे सोडून कोठेही काय हात लावत आहात असे सांगितले असता त्यांनी पुन्हा त्यांच्या हात विवाहितेच्या विनयभंग करण्याचा पुन्हा प्रयत्न केला व डॉक्टरांच्या हात झटकून उभी राहिली व दरवाजाकडे जावू लागली तेव्हा डॉ आबिद शेख यांनी दरवाजा उघडू नका , गोळ्या बाटल्या घेऊन जा असे म्हणाले .त्यांनी विवाहितेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याने विवाहितेने दवाखान्याच्या दरवाजा उघडून जोरात आरडाओरड केली असता आजूबाजूचे व रस्त्यावरील लोकांची गर्दी जमा झाली त्यात विवाहितेच्या दिर अकिल पठाण सदर ठिकाणी आले असता त्यांना घडलेली घटना विवाहितेने कथन केली . अकिल पठाण यांनी विवाहितेस धीर देऊन सांगितले की , आपण आधी घरी जाऊ आणि मग सविस्तर बोलू . घरी गेल्यावर विवाहितेने सविस्तर घटना आपले पती सासू-सासरे यांना सांगितल्यावर डॉ आबिद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे ठरले .त्यानुसार डॉ आबिद शेख यांच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशनला भाग पाच गु र नं १९९/२०२१ भादवि कलम ३५४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे .
पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत…

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]