महाराष्ट्र 9

चोपड्यातील मालती हॉस्पिटलचे डॉ.हेमंत पाटील यांच्या निष्काळजी व हलगर्जी पणामुळे माझ्या आईचा दुर्दैवी मृत्यू …
किरण गुर्जर ( जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी संघटना )

[espro-slider id=13780]

चोपड्यातील मालती हॉस्पिटलचे डॉ.हेमंत पाटील यांच्या निष्काळजी व हलगर्जी पणामुळे माझ्या आईचा दुर्दैवी मृत्यू …
किरण गुर्जर ( जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी संघटना ) यांचा आरोप …
चोपडा प्रतिनिधी :—-


चोपडा येथील हरेश्वर रोड नर्मदा नगर मधील मालती हॉस्पिटलमध्ये सिंधुबाई मच्छिंद्र पाटील वय वर्षे ६५ यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . पण मालती हॉस्पिटलचे डॉ हेमंत पाटील यांचा निष्काळजी व हलगर्जीपणामुळे माझा आईला जीव गमवावा लागला अशा प्रकारचा आरोप किरण एम गुर्जर ( जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी संघटना ) यांनी केला आहे .
आरोपात त्यांनी म्हटले आहे की ,आयसीयू रूम असून त्यात ऑक्सिजनची व्यवस्था नाही ,
आयसीयू रूम असून संपूर्ण हॉस्पिटल फक्त एकाच कंपाउंडरच्या भरवश्यावर संपूर्ण रात्रभर असते .हॉस्पिटलमध्ये आयसीयू रूम असून रात्र पाळीस एकही डॉक्टर उपलब्ध नसतो .
मी स्वतः रात्रभर एक एक तासाने माझा आईचा बीपी चेक केले, ज्यावेळेस बीपी १६० होता, तेव्हा त्यांच्या कंपाऊडरला सांगितले की, आईचा बीपी १६० च्या वरती जात आहे, तर तो कंपाउडर मला सांगायच्या की नॉर्मल आहे, आणि असं होतच राहते, पुन्हा रात्री एक तासाने चेक केले, तर १८० बीपी झालेला होता, परत रात्री अडीच वाजता बीपी चेक केला असता २४८ झाला मी परत कंपाउंडर कडे गेलो व त्याला सांगितले बीपी २४८ च्या वरती जात आहे .

डॉक्टरांना बोलून घ्या तर तो दुसऱ्या रूम मध्ये जाऊन झोपून गेला व त्याने कोणताही रिस्पॉन्स दिला नाही व रात्री ठिक पावणे चार वाजेला माझ्या आईचे दुर्दैवी निधन झाले .
मी रात्र भर आयसीयू मध्ये बसून होतो,ब्लड रिपोर्ट मध्ये सोडियम ९९ होता व १३५ नॉर्मल पाहिजे असतो, तसेच आईला बाकी कोणत्याही प्रकारची क्रिटिकल अवस्था नव्हती, किंवा बाकीचे ब्लड रिपोर्ट देखील नॉर्मल असताना, कोणत्याही प्रकारची गंभीर अवस्था नसतांना जीव गेला कसा..?असा सवाल किरण गुर्जर यांनी उपस्थित केला आहे .
यावर किरण गुर्जर यांनी सकाळी डॉक्टर आल्यानंतर विचारले असता, डॉक्टर हेमंत पाटील यांनी उलट जोराने सांगितले की, मी काही तुझ्याकडे आलो होतो का, पेशंटला माझ्याकडे टाक म्हणुन असं अर्वाच्य भाषेत, की जे डॉक्टरी पेशाला न शोभणारे संभाषण केले असल्याचे सांगितले आहे.
डॉक्टर हेमंत पाटील यांची भाषा उर्मट व डॉक्टरी पेशाला अशोभनीय असल्याचे त्यांनी सांगितले . दवाखान्यातील आयसीयू वॉर्ड मध्ये काहीच सोय सुविधा नाहीत तरी रुग्णांना दाखल का करून घेतात असा सवाल किरण गुर्जर यांनी उपस्थित केला आहे.
अशी उर्मीची भाषा वापरणारा डॉक्टर मी पहिल्यांदा पाहिला अशी भावना किरण एम गुर्जर यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी डॉ हेमंत पाटील यांना शिक्षा व्हावी व रुग्णांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा म्हणून तालुक्याचे तहसीलदार अनिल गावीत , प्रांताधिकारी सीमा अहिरे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागोजीराव चव्हाण , जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत , विभागीय आयुक्त नाशिक व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे इमेल द्वारे तक्रार केली आहे .वेळेत योग्य न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा किरण एम गुर्जर यांनी दिला आहे…

डॉक्टरांची प्रतिक्रिया
दि. २१ मे रोजी सायंकाळी साडे पाच वाजता मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला सिंधुबाई मच्छिंद्र पाटील वय- ६६ वर्ष रा. सनपुले यांना बेशुद्धावस्थेत आणण्यात आले. त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे असल्यामुळे त्यांना तात्काळ स्‍ट्रेचरवरून आयसीयूमध्ये दाखल करून घेतले. रुग्णास हाय ब्लडप्रेशर आणि डायबेटीस यासारख्या गंभीर आजारांचा पूर्व इतिहास होता असे नातेवाईकांनी सांगितले होते. या सर्व बाबींचा विचार करून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर रक्ताचे रिपोर्ट करण्यास सांगितले व बीपी चेक केला असता बीपी वाढला होता,तो कमी करण्यासाठी अंतरनिले द्वारे इंजेक्शन देऊन शर्तीचे प्रयत्न केले. तसेच ईसीजी काढला व आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. रक्ताचे रिपोर्ट आल्यानंतर त्यात इलेक्ट्रोलाईट इमबॅलेन्स आढळून आला, त्यात सोडियमचे प्रमाण कमी दिसून आले.त्यानुसार माझ्या परीने प्राथमिक उपचार केल्यानंतर , अवस्था अतिशय गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी पुढे नेण्याची आवश्यकता किंवा गरज पडू शकते याची पूर्ण कल्पना नातेवाईकांना दिली असता त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून सर्व जबाबदारी आमची राहील याची खात्री दिली त्यामुळे मी पुन्हा पुढील उपचार सुरू ठेवले.
त्यानंतर रुग्णाची तब्येत रात्री जेव्हा खालवली तेव्हा मी स्वतः रात्री हॉस्पिटलला येण्यापूर्वी रुग्णास ऑक्सिजन लावण्याच्या स्टाफला सूचना दिल्या. त्यानंतर तात्काळ हॉस्पिटलला येऊन रुग्णाची तपासणी करून चिकित्सा केली असता रुग्णाचा तब्येतीत सुधारणा न दिसल्यामुळे रुग्णास व्हेंटिलेटरवर घेण्यात आले. हे सर्व करत असतांना रुग्णाचे नातेवाईक व माझा चार जणांचा स्टाफ माझ्या मदतीला उपस्थित होता.इतके शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर ही रुग्णाची श्वसनक्रिया व हृदयक्रिया अचानक बंद पडल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा आम्ही रुग्णाचा नातेवाईकांना सल्ला दिला ,परंतु ते आम्हास व स्टाफला दमदाटी करून रुग्णाचा मृतदेह जबरदस्तीने सोबत घेऊन गेले.
मी आतापर्यंत साथीच्या काळात स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता सुविचार व मालती हॉस्पिटलच्या माध्यमातून चोपडा वासियांची अहोरात्र सेवा केली व करत आहे. तसेच मी चोपडा तालुक्यातील नागरिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी बांधील आहे.
( डॉ हेमंत पाटील – मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल , चोपडा )

तहसीलदार प्रतिक्रिया
मयत रुग्णाचे नातेवाईक किरण गुर्जर यांनी डॉ हेमंत पाटील ( मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल – चोपडा ) यांच्या विरुद्धची तक्रार माझ्या वैयक्तिक व्हाट्सएप नंबरवर व चोपडा तहसील कार्यालयाच्या इमेलवर पाठविली आहे . सदर तक्रार मी जिल्हा शल्य चिकित्सक ( जळगांव ) यांच्याकडे फॉरवर्ड केली असून , जिल्हा शल्य चिकित्सक व वरिष्ठ पातळीवरून सदर बाबींची खात्री करून योग्य ती चौकशी केली जाईल…
( अनिल गावीत – तहसीलदार , चोपडा )

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]