बनावट सह्या व कागदपत्रे तयार करून दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयांची केली फसवणूक प्रकरणी मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन किरण देशमुख यांना दहा महिन्या नंतर अटक…
चोपडा प्रतिनिधी :—-

चोपडा शहरातील पाटीलगढी भागातील मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन किरण देविदास देशमुख यांनी हातेड खु !! येथील सेवानिवृत्त शिक्षक युवराज रामदास बाविस्कर ( वय वर्षे ७२ ) यांच्या मुदत ठेव पावत्यांवर परस्पर बनावट सह्या व कागदपत्रे तयार करून तब्बल दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात दी.०३/०७/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की ,
युवराज रामदास बाविस्कर ( वय ७२ ) रा हातेड खु !! हे शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हातेड तालुका चोपडा येथे सन १९७३ मध्ये शिक्षक म्हणून नोकरीस असताना त्याच शाळेत किरण देविदास देशमुख शिपाई म्हणून नोकरीस लागला होता तेव्हापासून फिर्यादी व संशयित आरोपी एकमेकांचे चांगले परिचीत होते .

युवराज रामदास बाविस्कर हातेड खु !! तालुका चोपडा येथील शाळेत नोकरी करीत असताना किरण देविदास देशमुख याने नोकरी दरम्यान चोपडा शहरात मराठा समाज नागरी सहकारी पतसंस्था मर्या चोपडा जिल्हा जळगाव ही पतसंस्था सुरु केली .त्याच्या व माझा चांगला परिचय असल्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवून मी पगारातून सेव्हिंग केलेले पैसे जमा करून सदर पतसंस्थांमध्ये मुदत ठेवी ठेवत होतो त्याप्रमाणे मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मला मिळालेली रक्कम व शेतीमालाची काही रक्कम सेविंग करण्याचे व दोन पैसे वाढतील या उद्देशाने किरण देविदास देशमुख यांची मराठा समाज नागरी सहकारी पतसंस्था मर्या चोपडा जिल्हा जळगाव या पतसंस्थेत एक लाख शेचाळीस हजार नऊशे चाळीस रुपये , दोन लाख सव्वीस हजार आठशे पंचाऐंशी रुपये , एकसष्ट हजार नऊशे रुपये ४६ दिवसाकरीता मुदत ठेवी ठेवल्या होत्या. ४६ दिवस पूर्ण झाल्यानंतर मी पतसंस्थेत जाऊन सदरच्या ठेवी नूतनीकरण करीत होतो अशाप्रकारे सन २०११ ते २०१८ पावेतो मराठा समाज नागरी सहकारी पतसंस्था मर्या चोपडा जिल्हा जळगाव या संस्थेमध्ये वरील रकमेच्या ठेवलेल्या ठेवी नूतनीकरण करीत गेलो होतो .

सन २०१८ मध्ये मी मराठा समाज नागरी सहकारी पतसंस्था मर्या चोपडा जिल्हा जळगाव येथे जाऊन व्यवस्थापक मनोज बन्सीलाल विसावे यांना समक्ष भेटून मी वरील रकमेच्या ठेवी व त्यावरील व्याजाची रक्कम काढणे बाबत सांगितले होते तेव्हा व्यवस्थापक मनोज विसावे यांनी मला आपण मराठा समाज नागरी सहकारी पतसंस्था मर्या चोपडा जिल्हा जळगाव येथे ठेवलेल्या ठेवींवर दि २० एप्रिल २०११ रोजी एक लाख रुपये कर्ज (ओव्हर ड्रॉप ) घेतलेली असून त्यावर थकित व्याज ९०४८० रुपये तसेच एका ठेवीवर एक लाख ऐंशी हजार रुपये ( ओव्हर ड्रॉप ) घेतलेले असून त्यावर थकीत व्याज एक लाख चोपन्न हजार सत्तर रुपये तसेच एका ठेवीवर ५० हजार रुपये कर्ज ( ओव्हरड्राफ्ट ) घेतलेली असून त्यावर थकित व्याज ४३०२१ रुपये असे एकूण दोन लाख सत्याऐंशी हजार पाचशे एकाहत्तर असे व्याज थकित असल्याची माहिती दिली म्हणून व्यवस्थापक मनोज विसावे यांना मी सदर ठेवीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नसल्याचे सांगितले होते तेव्हा त्याने माझे नावे घेतले कर्ज प्रकरण रेकॉर्ड मधून काढून मला दाखविले असता ,मी ठेवलेल्या ठेवी वर कर्ज घेतलेल्या वचनचिठ्ठी वर माझ्या नावाच्या बनावट सह्या केलेल्या दिसून आल्या म्हणून मी व्यवस्थापक मनोज विसावे यांना सदरच्या सह्या माझ्या नसून मी कर्ज घेतलेले नाही सदरच्या कर्ज कोणी घेतले आहे याबाबत विचारणा केली असता माझे नावावर व ठेवीवर पतसंस्थेचे चेअरमन किरण देविदास देशमुख यांनी सदरचे कर्ज घेतले असल्याची माहिती मिळून आली म्हणून मी पतसंस्थेचे चेअरमन किरण देविदास देशमुख यांना भेटून वरील काढलेल्या कर्जाबाबत विचारणा केली असता तो मला उडवाउडवीचे उत्तर देऊन स्वतःची अडचण सांगून कर्ज भरणा करण्याचे आजपावेतो हमी देत होता , पतसंस्थेचे चेअरमन किरण देशमुख याने ठेवलेल्या ठेवीवर काढलेले कर्ज पतसंस्थेत न भरल्याने व मराठा समाज नागरी सहकारी पतसंस्था मर्या चोपडा जिल्हा जळगाव या पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी मला आज पर्यंत परत न केल्याने म्हणून मी वारंवार पतसंस्थेत जाऊन चेअरमन किरण देशमुख यास समक्ष भेटून मी ठेवलेल्या ठेवीवर त्याने काढलेले कर्ज भरण्यास सांगून माझ्या ठेवीची मागणी करता त्याने आज पावेतो सदरचे कर्ज न भरता व मला माझे ठेवी परत न केल्याने युवराज बाविस्कर यांनी त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती आधारे मराठा नागरी सहकारी पतसंस्था मर्या चोपडा जिल्हा जळगाव या पतसंस्थेचे चेअरमन किरण देविदास देशमुख यास हातेड गावात सापळा रचून चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अटक केली आहे , सदर कामी पथकात प्रमोद पवार , जितेंद्र सोनवणे , प्रकाश मथुरे , हेमंत कोळी यांनी काम पाहिले आहे …