महाराष्ट्र 9

चोपडा तालुक्यातील पत्रकारांनी घेतली कोविडची लस…
प्रेरणा दर्पण फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश…

[espro-slider id=13780]

चोपडा तालुक्यातील पत्रकारांनी घेतली कोविडची लस…
प्रेरणा दर्पण फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश…
चोपडा प्रतिनिधी :—-


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे . त्याचबरोबर नागरिकांच्या लसीकरणावर केंद्र आणि राज्य सरकार भर देत आहेत .कोरोनाच्या काळातही पत्रकारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता फ्रंटलाईन वर्कर म्हणून नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे . त्यामुळे त्यांनाही इतर फ्रन्टलाइन वर्कर कर्मचाऱ्यांप्रमाणे ,कोविडची लसीकरण व्हावे या आशयाचे निवेदन प्रेरणा दर्पण फाउंडेशनच्या वतीने तालुक्याचे तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले होते .


पत्रकार हे सातत्याने बातमीदारी च्या निमित्ताने घराबाहेर असतात .त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे . त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाचा धोका आहे . सर्व पत्रकार मंडळींना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे म्हणून प्रेरणा दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम जाधव व सचिव लतिष जैन सातत्याने प्रयत्नशील होते .


तालुक्याचे तहसीलदार अनिल गावित व तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी प्रेरणा दर्पण फाउंडेशनच्या निवेदनाची दखल घेत नगरपालिका रुग्णालयात पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली . सदर लसीकरण कामी जगदीश बाविस्कर (आरोग्य पर्यवेक्षक) , सचिन शिंदे ( अधीपरिचारक) , दिपाली सोनवणे , सुनीता पावरा (आरोग्य सेविका) , पल्लवी सोनवणे ,संजना विसावे (आशा वर्कर) , विवेक कोतवाल ( संगणक ऑपरेटर ) इत्यादींनी काम पाहिले…

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]