चोपड्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लॉन्ट
कार्यान्वित ; दिवसातून १२५००० लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार .…
लोकसहभागातून उभा राहिलेला देशातील पहिला प्लांट ….
चोपडा ( प्रतिनिधी )—–

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून
तहसीलदार अनिल गावित व शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील यांच्या अथक प्रयत्नाने व असंख्य दात्यांच्या सहकार्याने लोकसहभागातून उपजिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लॉन्टची उभारणी
करण्यात आली आहे.

ऑक्सिजन प्लॉन्टची तीन
दिवस चाचणी घेण्यात आली असून,हवेतून प्रतिदिन १,२५,००० लिटर ऑक्सिजन निर्मिती होत आहे.अक्षय तृतीया व रमजान ईदच्या शुभ मुहूर्तावर उदघाटन होणार होते परंतू कोरोना मुळे उच्च न्यायालयाने सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी
घातली असल्याने हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लॉन्टचे औपचारिक
पूजन करण्यात येऊन प्लॉन्ट सुरू करण्यात आला.आजपासून उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांना प्लॉन्ट मधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला आहे.देशात लोकसहभातून उभारला जाणारा चोपड्यातील पहिला प्रकल्प आहे.

हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लॉन्टचे पूजन तहसीलदार अनिल गावीत ,नायब
तहसीलदार राजेश पऊळ,उपजिल्हा रुग्णालयाचे
वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज पाटील,वैद्यकीय
अधिकारी डॉ गुरुप्रसाद वाघ,डॉ.नरेंद्र पाटील
यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी न्यायाधीश गणेश लांडबले,सरकारी वकील वैशाली निरगुडे शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील कुलदीप पाटील आदींची उपस्थिती होती.कोरोना
च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू
लागला.भविष्यात येणारी कोरोनाची तिसरी व चवथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून
१२ लाख रुपये खर्चाच्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लॉन्टची उभारणी करण्यात
आली आहे.विशेष म्हणजे लाईट बंद राहिल्यास प्लॉन्ट जनरेटरवर चोवीस तास सुरू राहू शकतो. त्याचा एका दिवसाचा खर्च २,७००/-रुपये येणार आहे.हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लॉन्ट मधून
प्रतिदिन १,२५,००० लिटर ऑक्सिजन निर्मिती होणार असून, २१ जंबो ऑक्सिजन सिलेंडरची गरज भागणार आहे.त्यामुळे ऑक्सिजनचे संकट कायमचे दूर होऊन असंख्य कोरोना रुग्णांचे प्राण वाचणार आहेत.