महाराष्ट्र 9

मंगरूळ येथे जुगार अड्ड्यावर छापा , पाच जणांवर कारवाई

[espro-slider id=13780]

मंगरूळ येथे जुगार अड्ड्यावर छापा , पाच जणांवर कारवाई
चोपडा प्रतिनिधी :—


मंगरूळ ता चोपडा येथील चौकात इलेक्टीक पोलच्या खाली रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास जुगार खेळताना पाच जण आढळून आले त्यांचाकडून पंधरा हजार चारशे रुपये किमतीचे मोबाईलसह , रोख मुद्देमाल जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले .
अक्षय तृतीयेला जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जातो . लाखो रुपयांची उलाढाल होत असते .
अडावद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी त्यांच्या सहकार्याना मंगरूळ येथे खात्री करण्यासाठी पाठविले त्यात मंगरूळ येथील चौकात रात्री विलास पाटील ,


संजय पाटील ,यशवंत निकम, अमोल पाटील व संजय लक्ष्मण सोनवणे सर्व रा. मंगरूळ हे पाच जण रात्री जुगार खेळताना आढळुन आले . त्यांचा कडुन जुगारासह मोबाईल व रोख रक्कम असे एकुण पंधरा हजार चारशे रुपये व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कार्यवाहीत पोलीस हवलदार नासीर तडवी ,संतोष गोसावी , होमगार्ड संजय पवार ,मयुर निकम ,कृष्णा महाजन ,सदानंद पाटील आदीनी छापा टाकला .


पाचही संशयिताना अडावद पोलीस ठाण्यात आणले असता त्यांच्या विरुध्द नासीर तडवी यांच्या खबरी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर कारवाईने जुगार खेळणार्‍याचे धाबे दणावले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण दांडगे करित आहेत…

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]