महाराष्ट्र 9

अखेर अंनिसच्या प्रयत्नाने थुंकी चाटण्याची किळसवाणी शिक्षा देणाऱ्या जातपंचायतवर गुन्हा दाखल

[espro-slider id=13780]

अखेर अंनिसच्या प्रयत्नाने थुंकी चाटण्याची शिक्षा देणाऱ्या जातपंचायतवर गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधि :—-


चहार्डी ता. चोपड़ा येथील माहेर असलेली पिडीत महिला अर्चना अनिल बोडके या महिलेस काही दिवसापुर्वी वडगांव पो. पिंजर ता. बार्शीटाकळी जि. अकोला येथील नाथजोगी जातपंचांनी न्यायनिवाडा करतांना केळीच्या पानावर पंचांनी थुंका़यचे व ती थुंकी पिडीत महिलेने चाटायची व पायावर नाक घासून तोंड काळे करायचे व सदर महिलेची मिरवणूक काढायची अशी शिक्षा सुनावली होती तसेच एक लाख रुपये दंड देखील वसूल केला,समाजातून बहिष्कृत केले, कारण महिलेने न्यायालयात घटस्पोट घेतला व पुनर्विवाह केला ही बाब नाथजोगी समाजातील जातपंचांना मान्य नव्हती.

अंनिसच्या पाठपुराव्याला अखेर यश…. पिडीत महिलेने महाराष्‍ट्र अंनिस जळगांव शाखा यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जळगांव कार्यकत्यांनी चोपडा शाखेशी संपर्क केला व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जळगांव तसेच चोपडा शहर पी. आय . अवतारसिंग चव्हाण यांच्याशी संपर्क करुन लेखी तक्रार केली, व पिडीत महिला व कुटूंबीयांना तसेच नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक बहिस्कार विरोधी कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंदविण्यासाठी आग्रही भुमिका घेतली, याकामी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे, महिला असोसिएशन सदस्या वासंतीताई दिघे, चोपडा तालुका कार्याध्यक्ष डॉ. अय्युब. आर. पिंजारी, जळगांवचे शिरीष चौधरी, डॉ. नरेंद्र शिरसाठ, पत्रकार आर. डी. पाटील, सचिन जैस्वाल व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पी. आय अवतारसिंग चव्हाण यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे .अंनिसचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाशभाई पाटील तसेच जातपंचायत विभाग प्रमुख क्रुष्णा चांदगुळे यांच्या मार्गदर्शनाने सामाजिक बहिस्कार प्रतिबंध व निवारण अधिनियम 2016, जातपंचायत विरोधी कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दि. 13 में 2021 रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे येवून अर्चना अनिल बोडके या महिलेसोबत कल्पेश बाबर, सुदाम सिद्धू बाबर, लक्ष्मीबाई सुदाम बाबर, दिपाबाई काशीनाथ शिंदे यांनी नाथजोगी समाजातील पंच एकनाथ सावळा शिंदे, प्रेमनाथ धर्मा शिंदे, गणेश नागो बाबर, शिवनाथ एकनाथ शिंदे, किसन शंकर सावंत, दिनेश भगवान चव्हाण, काशिनाथ रघुनाथ बाबर, कैलास एकनाथ शिंदे, कैलास नानु सावंत, संतोष विश्वनाथ शेगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]