महाराष्ट्र 9

अवैधरित्या विदेशी दारू चोरटी विक्री करताना एकास अटक , चोपडा शहर पोलिसांची कारवाई

[espro-slider id=13780]

अवैधरित्या विदेशी दारू चोरटी विक्री करताना एकास अटक , चोपडा शहर पोलिसांची कारवाई


चोपडा प्रतिनिधी :—


चोपडा येथील शांती वाईन शॉप जवळील हॉटेल निखीलच्या आडोश्याला एक इसम अवैधरित्या चोरटी दारू विक्री करीत असल्याची गुप्त माहिती चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी संतोष पारधी , शेषराव तोरे ,विलेश सोनवणे , सुभाष सपकाळ , संदीप भोई इत्यादीना त्यांच्या दालनात बोलून सांगितले की चोपडा शहरात नारायणवाडी भागात शांती वाईन शॉप जवळ असलेल्या हॉटेल निखिलच्या आडोशाला आकाश प्रकाश चौधरी रा रंगराव आबा नगर चोपडा हा इसम स्वतःचे फायद्यासाठी विनापास व परमिट शिवाय विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून आहे


अशी खात्रीशीर बातमी मिळाली असून सदर बातमीचे खात्री करून त्याच्यावर कारवाई करा असे कळविले त्यानुसार संतोष परदेशी यांनी पंचांना चोपडा शहर पोलीस स्टेशनला बोलावुन त्यांना वरील प्रमाणे हकिकत समजावून सांगून सोबत येण्यास सांगितले असता पंच सोबत येण्यास तयार झाल्याने पोलिस स्टाफ व पंच असे प्रोहिबिशन रेड कामी लागणारे साहित्य सोबत घेऊन खाजगी वाहनाने चोपडा शहर पोलीस स्टेशन येथून निघून नारायणवाडी भागात जाऊन बातमी पासून थोड्या अंतरावर वाहने थांबवून तेथून पायी बातमीचे ठिकाणी जाऊन आडोशातून बातमीची खात्री करता एक इसम हॉटेल निखिलच्या आडोशाला पुठ्ठ्याच्या खोक्यांमध्ये काहीतरी घेऊन बसलेला दिसल्याने आमची व पंच यांची खात्री झाल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष सदर इसमास अचानक छापा टाकून त्या जागीच पकडून त्याचे ताब्यातील पुठ्ठ्याचे खोके व त्यातील विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या तसेच टीन असे मिळून आल्याने पंचा समक्ष पकडलेल्या इसमास त्याचे नाव आकाश प्रकाश चौधरी वय 21 वर्षे रंगराव आबा नगर चोपडा असे सांगितले. त्यास विदेशी दारू बियर बाळगण्याचा परवाना आहे अगर कसे याबाबत विचारले असता त्याने त्याच्याकडेच कोणत्याही प्रकारचे परवाना नसल्याबाबत सांगितले .त्याचे कब्जात मिळून आलेल्या प्रोहिबिशन गुन्ह्याच्या मालात बियरच्या बाटल्या विदेशी दारू व टीन इत्यादी अवैधरित्या विक्री करताना आठ हजार दोनशे वीस रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . महाराष्ट्र दारूबंदी कायदा नुसार कलम ६५ (ई) प्रमाणे कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे…

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]