
शिवकृपा कॉटन जिनिंग येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

चोपडा प्रतिनिधी :—–
येथील आडगाव – विरवाडे रस्त्यालगत असलेल्या शिवकृपा कॉटन जिनिंग येथे मजुरीसाठी कामानिमित्त परप्रांतीय कुटुंब राहत होते दि. 25 एप्रिल रोजी रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास रेखा मंडलोई वय – २४ या विवाहितेने गळफास घेतल्याचे तिच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आले असता त्यांनी पुढील उपचारासाठी तिला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

रेखा मंडलोई वय – २४ शिवकृपा कॉटन पिन वर्कर कॉटर येथे गळफास घेतला असल्याकारणाने पुढील उपचारासाठी तिला तिचे पती व इतर लोकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यावेळी कर्तव्यावर असणारे डॉ नरेंद्र पाटील यांनी तिची तपासणी केली असता तिला मयत घोषित केले .
डॉ नरेंद्र पाटील यांनी सदर खबर चोपडा शहर पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनीवरून दिली असता ,चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू २८ / २०२१ सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे . घटनास्थळी चोपडा शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी पी आय अंबादास मोरे यांनी भेट दिली असून पुढील प्राथमिक तपास पो. ना. योगेश पालवे करीत आहेत.
