वेले येथील मानव सेवा तिर्थ या संस्थेस विश्व मानव रूहानी केंद्रातर्फे मदत
चोपडा प्रतिनिधी :——-
येथील मानवसेवा तीर्थ ही संस्था बेवारस मनोरुग्णांचे संगोपन व पुनर्वसनाचे भरीव असे कार्य करीत आहे . सदर संस्थेत रस्त्यावर बेवारस फिरणारे जवळपास ८५ मनोरुग्ण असून संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व व्यवस्थापक एन आर पाटील अहोरात्र मेहनत घेत आहेत .

सदर संस्था सामाजिक बांधिलकी जोपासत मानव कल्याणासाठी , दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी ,अनाथांसाठी माईची भूमिका बजावत आहेत . संस्थेची आर्थिक बाजू कमकुवत असून सुद्धा संस्थेतील बेवारस मनोरुग्ण , अनाथ मुले , वृद्धाश्रमातील आई-बाबांसाठी संस्था लोकसहभागातून विविध प्रकारचे उपक्रम व कार्यक्रम घेतच असते

. संस्थेचे कार्य पाहून देणारे दाते ही आपापल्या परीने मदत करीत असतात त्याचाच प्रत्यय म्हणून विश्व मानव रूहानी केंद्र नवानगर शाखा चोपडा यांच्या सहकार्याने सदर संस्थेला एक महिन्याच्या किराणा , सीधा – आटाआणि ६५ ब्लॅंकेट असा आजच्या बाजारभावानुसार ८२ हजार रुपयाची वस्तुरूप मदत चोपडा तालुक्याचे तहसीलदार अनिल गावित व नायब तहसीलदार राजेश पउळ यांच्या हस्ते देण्यात आली . यावेळी विश्व मानव रूहानी केंद्र नवानगर शाखा चोपडाचे सेवेदार उपस्थित होते …
