जिल्हा परिषद सदस्य राज्य संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी चोपड्याच्या प्रा.डॉ. निलम पाटील यांची निवड
चोपडा ( प्रतिनिधी )—–
मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या
जिल्हा परिषदेच्या अंर्तगत येणाऱ्या सर्व जिल्हा
परिषद सदस्यांची राज्यस्तरीय संघटनेची स्थापना करण्यात आली असून,संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र
महिला अध्यक्षपदी चहार्डी-बुधगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या प्रा.डॉ.निलम शशिकांत पाटील
यांची निवड करण्यात आली आहे.या बाबत
संघटनेच्या राज्य अध्यक्षा अमृताताई पवार (नाशिक) यांचे निवडीचे पत्र प्रा.डॉ.निलम पाटील यांना नुकतेच प्राप्त आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जिल्हा परिषद
सदस्य व खेड्यापाड्यातील व दुर्गम भागातील नागरिकांवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या संघटने ची आवश्यकता असून,याची जाणीव ठेवून जिल्हा परिषद सदस्यांची राज्यस्तरीय संघटना स्थापन करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेत येणारा शासनाचा निधी,त्याचे सदस्यांना समान वाटप होऊन,जिल्हा परिषद सदस्यावर अन्याय होणार नाही.तसेच शासकीय कामकाजात सदस्यांना येणाऱ्या दैनंदीन अडीअडचणी व त्यांचे प्रश्न सोडवण्याचा राज्य संघटनेच्या माध्यमातून केला जाणार आहे. जिल्हा परिषद सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील

यांची जिल्हा परिषद सदस्य राज्य संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी निवड झाल्या
बद्दल विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई
गुजराथी,चोसाका माजी चेअरमन अड.घनश्याम
पाटील,पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी
संचालक नेमीचंद जैन,बाजार समितीचे सभापती
कांतीलाल पाटील,उपसभापती नंदकिशोर पाटील
माजी सभापती जगन्नाथ पाटील,गिरीष पाटील,
चोसाका चेअरमन अतुल ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी अभिनंदन
केले आहे. * उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद सदस्यांचे प्रश्न संघटने मार्फत सोडविणार : प्रा.डॉ.निलम पाटील * नाशिक विभागातील जिल्हा परिषदे संदर्भात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठीची जबाबदारी संघटनेने माझेवर सोपवली असून,ती जबाबदारी पूर्णपणे सोडविण्याचा माझा प्रयत्न असेल.

सद्यस्थितीत जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार कमी करण्यात आलेले असून,त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठीअडचणी येत आहेत.परंतू संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्यांचे व ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
