अखेर चोपड्याच्या पाच व्हेंटीलेटरची घरवापसी,भाजप कार्यकर्त्यांच्या लढ्याला चौथ्या दिवशी यश
चोपडा प्रतिनिधी – —-
येथील उपजिल्हा रुग्णालयास रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी गतवर्षी पंतप्रधान फंडातून पंधरा व्हेंटीलेटर उपलब्ध करुन दिले होते.दरम्यानच्या काळात चोपड्यासाठी दिलेले व्हेंटीलेटर उपजिल्हा रुग्णालयाने इतरत्र पाठवून दिल्या असल्याने उपजिल्हा रूग्णालयातील कोरोना रुग्णाची त्याअभावी मोठे हाल होत होते , अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत होती या पार्श्वभूमीवर खासदार रक्षा खडसे यांनी दि.१ एप्रिल रोजी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.त्यामध्ये भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी , जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष नरेंद्र एस पाटील , तालुकाध्यक्ष पकज पाटील , शहर अध्यक्ष गजेद्र जयस्वाल , प्रदिप पाटील , रंजनाताई नेवे जिल्हा उपाध्यक्ष , प्रकाश पाटील तालुकाध्यक्ष युवा मोर्चा ,तुषार पाठक ,सुनिल सोनगीरे , प्रवीण चौधरी , विक्की आहिरे ,दिपक पाटील (वेले ) यांनी आक्रमक होवून व्हेंटीलेटर परत मिळालेच पाहिजे म्हणून लढा दिला.

खासदारांनी देखील दोन दिवसात व्हेंटीलेटर परत आणण्याचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांना दम भरला.त्यामुळे आज पाच व्हेंटीलेटर पुन्हा रूग्णालयात आणण्यात आले आहेत.त्यामुळे रूग्णांना नक्कीच फायदा होणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पालिका सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण , प्रांताधिकारी सीमा अहिरे ,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुमित शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते .
खासदार रक्षा खडसे यांनी त्यांच्या प्रयत्नातून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात 15 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले होते.या व्हेंटिलेटरची विल्हेवाट मधल्या काळात परस्पर दुसरीकडेच करण्यात आली होती. त्यावर खा.खडसेंनी नाराजी व्यक्त करीत संबधित व्हेंटिलेटर येत्या दोन दिवसात जसेच्या तसे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांना देण्यात आल्या होत्या …






