महाराष्ट्र 9

अवैध वाळू वाहतुकीला आळा घाला
घाडवेल ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

[espro-slider id=13780]

अवैध वाळू वाहतुकीला आळा घाला
घाडवेल ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
चोपडा प्रतिनिधी :—–
चोपडा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीने कळस गाठला आहे तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी देखील वाढली आहे . शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे , मारणे इत्यादी प्रकार सर्रास घडत आहेत तसेच मागील महिन्यात चहार्डी – घाडवेल रस्त्यालगत असलेल्या महावितरणच्या डीपीला अवैध वाळू चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली होती त्या ट्रॅक्टरवर संपूर्ण डीपी कोसळल्याने ट्रॅक्टर ने पेट घेतला होता व त्यात चालक गंभीररीत्या भाजला गेला होता अशा अनेक घटना तालुक्यात सातत्याने घडत असताना देखील अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाच्या अंकुश मात्र दिसून येत नाही ,ही विचार करायला लावणारी बाब आहे .


चोपडा तालुक्यातील घाडवेल तापी नदीपात्रातून राजरोस अवैध वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारी व निवेदने ग्रामस्थांनी वारंवार तहसीलदार यांना दिली आहेत पण आतापर्यंत मात्र कारवाई शून्य दिसून आली आहे याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .


तापी नदीपात्रातून रात्री-अपरात्री दिवसा मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे चालू आहे .मुजोर वाळू चोर ट्रॅक्टर्स वेगाने तर चालवतात पण रस्त्यावरील पायी चालणारे ,बैलगाडी , मोटार सायकलस्वारांना कट मारतात .सदर बाबतीत जर कोणी त्यांना जाब विचारला तर ते धमकी देतात ,शिवीगाळ करतात , ट्रॅक्टरखाली चिरडून टाकू , मारून टाकू , आमचे कोणीच काही करू शकत नाही असे उर्मटपणे बोलतात अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी तालुक्याचे तहसीलदार अनिल गावित यांना दिले आहे व अवैध वाळू चोरी करणाऱ्या संबंधितांच्या कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे .
सदर निवेदनावर हुकुम भिला पाटील , चंद्रकांत शिवाजी पाटील ,समाधान डोंगर पाटील ,विजय साहेबराव पाटील ,गजानन योगराज पाटील , केदारनाथ गंगाराम पाटील , दिपक देवीदास पाटील यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत …

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]