महाराष्ट्र 9

चोपडा तालुक्यातील माध्यमिक संघटना सरसावल्या प्रशासनाच्या मदतीला
नविन कोविड-19 सेंटर साठी दिला १ लाख रु.चा निधी

[espro-slider id=13780]

चोपडा तालुक्यातील माध्यमिक संघटना सरसावल्या प्रशासनाच्या मदतीला
नविन कोविड-19 सेंटर साठी दिला १ लाख रु.चा निधी
चोपडा प्रतिनिधी ——
नविन तहसिल कार्यालय येथे डे – केअर कोविड-19 सेंटर साठी माध्यमिक संघटनांनी केलेल्या आवाहनाला माध्यमिक शिक्षकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत वर्गणीतुन तेथे लागणारा ऑक्सिजन सिलेंडर,पाईपलाईन व इतर अत्यावश्यक वैद्यकिय सुविधांसाठी तब्बल १ लाख रु.चा मदतनिधीसाठी धनादेश जमा केला.


शिक्षकांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भुमिकेतुन चोपडा तालुक्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनांच्या वतीने मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने मदतनिधी देत आपल्या सामाजिक जाणिवेचे व संवेदनशीलतेचे दर्शन घडविले.
नुकताच तहसिलदार अनिल गावित यांचेकडे १ लाख रु.चा धनादेश सुपुर्द करण्यात आला.
या सामाजिक उपक्रमात चोपडा तालुका माध्यमिक मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेतर संघटनांसमवेतच चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीने रु.११००० रु.ची मदत दिली.तसेच तालुका कलाध्यापक संघाने आपले भरीव योगदान दिले.यासोबतच माध्यमिक शिक्षक सेना,माध्यमिक शिक्षक भारती संघटना,क्रीडाशिक्षक संघटना,हिंदी अध्यापक संघ,ज्युक्टो संघटना तसेच काँग्रेस शिक्षक सेल व राष्ट्रवादी शिक्षक सेल या विविध संघटनांनी आपले मोलाचे योगदान दिले.


यावेळी चोपडा पतपेढीचे अध्यक्ष विकास शिर्के,विजय पाटील, मुख्याध्यापक संघाचे प्रविण पाटील,मंगेश चौधरी,शिक्षक संघाचे मंगेश भोईटे,दिनेश बाविस्कर,कलाध्यापक संघाचे सुनिल पाटील,अर्जुन कोळी,ज्युक्टोचे रमाकांत धनगर , एस.आर.सोनवणे , एस.एल.पाटील , आर.डी.पाटील, राधेशाम पाटील आदि उपस्थित होते.
तहसिलदार अनिल गावित , नायब तहसिलदार राजेश पउळ , नायब तहसिलदार महेश साळुंखे ,शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस.बी.पाटील,मेडिकल असोसिएशनचे रमाकांत सोनवणे यांनी तालुक्यातील सर्व माध्यमिक संघटनांचे दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]