गावठी रिव्हॉल्व्हर,एक काडतुस सह एकास ताब्यात

चोपडा:-(प्रतिनिधी) तालुक्यातील वैजापूर येथे गावठी रिव्हॉल्व्हर विक्रीसाठी आणणाऱ्या उमर्टी येथील विक्रेत्यास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.अटकेतील भामट्याकडून जिवंत काडतुस आणि रिव्हॉल्व्हर ताब्यात घेण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील तालुक्यातील वैजापूर येथे रिव्हॉल्व्हर विक्रीसाठी तरुण येत असल्याची खात्री झाल्यावर गुन्हे शाखेच्या पथकातील नारायण पाटील ,रामचंद्र बोरसे,मनोज दुसाने ,प्रवीण विराळे,उमेश गिरी,किरण धनगर यांचे पथक रवाना झाले होते.लासुर सत्रासेन मार्गे उमर्टी गावपुढील वैजापूर येथे पथकाने सापळा लावला असतांना प्रतापसिंग उनसिंग खिच्छी (४८) रा उमर्टी ता. वरला जि बडवाणी मध्यप्रदेश हा पिस्तुल विक्रीच्या प्रयत्नात असतांना पथकाने त्याच्यावर झडप घालत अटक केली त्याच्या ताब्यातील कमरेला लावलेलं २५हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि एक हजार रुपये किमतीची एक जिवंत काडतुस त्याच्या उजव्या खिशात मिळून आले. भाग ६ गु र न ३०१४/२०१९ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५नुसार पो ना किरण मोहन धनगर यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…





