महाराष्ट्र 9

वाळू वाहतूक करणाऱ्या  ट्रॅक्टरची ट्रांसफार्मरला धडक, ट्रॅक्टर जळून खाक तर चालकही गंभीर भाजला :अधिक उपचारासाठी जळगाव हलविले

[espro-slider id=13780]

वाळू वाहतूक करणाऱ्या  ट्रॅक्टरची ट्रांसफार्मरला धडक, ट्रॅक्टर जळून खाक तर चालकही गंभीर भाजला :: अधिक उपचारासाठी जळगावी हलविले

चोपडा प्रतिनिधी :–सचिन जैस्वाल

वाळू वाहतुकीसाठी ट्रॅक्टर चहार्डी येथून घाडवेल कडे जात असताना डावा देव मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर घाडवेल कडे ट्रॅक्टर जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर  सरळ भागवत चौधरी यांच्या शेतात असलेल्या ट्रांसफार्मरला ट्रॅक्टरची धडक बसली व त्यावर जोरात आदळले. त्यात डी पी ट्रॅक्टर वर कोसळल्याने व ट्रॅक्टरचे डिझेल बाहेर पडल्याने ट्रॅक्टरने पेट घेतला आणि त्यात क्षणार्धात ट्रॅक्टर जळून खाक झाले. सुदैवाने वीजपुरवठा बंद असल्याने अधिक हानी टळली. मात्र यात अजय बारकू भिल्ल ( वय अंदाजित 15 वर्षे ) वयाचा ट्रॅक्टर चालक गंभीर भाजला गेला असून अधिक उपचारासाठी त्याला जळगाव येथे हलविण्यात आले आहे.


सदरची घटना सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेदरम्यान घडली आहे. सविस्तर असे की,  घाडवेल येथे असलेल्या तापी नदीच्या पात्रात अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी साडेचार वाजता ट्रॅक्टर चहार्डी येथून निघाले असता घाडवेल व चहार्डीच्या दरम्यान चालकाचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने सरळ भागवत चौधरी यांच्या शेतात असलेल्या ट्रांसफार्मरच्या दोन पोल मध्ये जाऊन ट्रॅक्टर धडकले. त्या ट्रॅक्टरचा वेग जास्त असल्याने पोल वाकून ट्रांसफार्मर ट्रॅक्टरवर आला आणि ट्रॅक्टर मधील डिझेल बाहेर आल्याने ट्रॅक्टरने क्षणार्धात पेट घेतला आणि ट्रॅक्टर जळून खाक झाले. त्यात आजूबाजूच्या तारा तुटलेल्या होत्या. यामध्ये चहार्डी येथील रहिवासी बारकू भिल यांचा मुलगा चालक अजय बारकू भिल्ल ( वय अंदाजित 15 वर्षे ) हा 60 ते 70 टक्के भाजला गेल्याने त्याला अधिक उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. सदर घटना चहार्डी येथे व घाडवेल येथे माहिती झाल्यानंतर बघ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅक्टरचे चारही चाक जळून खाक झाले होते तर त्याच्यावर ट्रांसफार्मर कोसळलेला असल्याने ट्रॅक्टर मात्र बेचिराख झाले आहे .

सदर घटनेचा अद्याप पर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही .सदर घटनेची अधिक माहिती साठी महावितारणाचे गायकवाड यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता सखोल चौकशी सुरू असून त्या संदर्भात वरिष्ठांना अहवाल सादर केला जाईल व सायंकाळपर्यंत गुन्हा नोंदविणार असल्याचे सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]