महाराष्ट्र 9

पिपल्स बँक तर्फे बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार ; चोपडा येण्याची केली इच्छा व्यक्त

[espro-slider id=13780]

पिपल्स बँक तर्फे बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार ; चोपडा येण्याची केली इच्छा व्यक्त
चोपडा ( प्रतिनिधी ) — जळगाव जिल्हा बँक असोसिएशनच्या वतीने नुकतेच दादा नेवे यांना शिवरत्न पुरस्कार पदमभूषण श्रीमंतश्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या खास उपस्थितीत पुणे येथे एका छोट्याखाणी कार्यक्रमात प्रदान करण्यात आले यावेळी चोपडा पिपल्स बँकच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला तर त्यावेळी बाबासाहेब पुरंदरेनी चोपडा एकदा येईन अशी इच्छा व्यक्त केली
शिवचरित्र व्याख्याते ,जिल्हा बँक असोसिएशनचे माजी अध्यक्ष व जळगाव पिपल्स बँकेचे संचालक दादा नेवे यांना असोसिएशनच्या वतीने शिवरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले होते मात्र बाबासाहेब पुरंदरे यांच्या खास उपस्थितीत हा सोहळा व्हावा अशी असोसिएशनची इच्छा होती मात्र त्यांची प्रुकृती ठीक नसल्याने ते येऊ शकत नाही असे त्यांचा कडून सांगण्यात आले होते तदनंतर मात्र असोसिएशनचे पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी पुणे येथे एका छोट्याखाणी कार्यक्रमात त्यांनी तो पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी चंद्रहास गुजराथी यांनी सन्मान पत्राचे वाचन केले चोपडा पिपल्स बँकेच्या वतीने देखील सत्कार करण्यात आले यावेळी बाबासाहेब पुरंदरेनी खान्देशाची आठवण करत त्यांनी सांगितले की, खान्देशाला ऐतिहासिक वारसा आहे खान्देशाने दिले आहे त्यामुळे मला एकदा खान्देशात यायचे आहे आणि चोपड्यात येण्याची जास्त इच्छा आहे दिवाळी नंतर मी चोपड्याला नक्कीच येईन अशी इच्छा प्रगट केल्याने चोपडा पिपल्स बँकेच्या वतीने निमंत्रण देण्यात आले चोपडा पिपल्स बँकांच्या वतीने चंद्रहासभाई गुजराथी यांनी सत्कार केले यावेळी त्यांचा सोबत असो.चे अध्यक्ष सतीश मदाने, जळगाव पिपल्स बॅंकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष पंकज मुदंडा,तज्ञ संचालक जे.एम.अग्रवाल, रावेर पिपल्स बँकचे चेअरमन ज्ञानेश्वर महाजन,संचालक डॉ. नरेंद्र शिरसाट, शरदशेठ यावलकर, सूर्यभान चौधरी , सौ शांता वाणी, प्रकाश कोठारी ,चोपडा पिपल्स बँकचे मोरेश्वर देसाई, ऍड रविंद्र जैन, नेमीचंद जैन , तर जळगाव पिपल्सचे सुनील पाटील, विलास बोरोले, डॉ.सी.बी.चौधरी, मुख्य कार्यकारणी संचालक दिलीप देशमुख व्यवस्थापक देविदास पाटील आदी हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमळनेर बँकांच्या संचालिका सौ वसूधरा लांडगे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]