महाराष्ट्र 9

चोपड्यात पाणी पाऊच प्लास्टिक पकडले५ हजार दंडाचा पंचनामा बदलवून निव्वळ ५०० रुपयांचा दंड : न.पा.ची ‘तोडपाणी’ कारवाई

[espro-slider id=13780]

चोपड्यात पाणी पाऊच प्लास्टिक पकडले५ हजार दंडाचा पंचनामा बदलवून निव्वळ ५०० रुपयांचा दंड : न.पा.ची ‘तोडपाणी’ कारवाई 

         चोपडा(प्रतिनिधी)-शहरात नगरपालिकाकडुन प्लास्टिक बंदी कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे निव्वळ सोंग करण्यात येत आहे. या संदर्भात आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग मिळून पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दि.२१ सप्टेंबर  रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी पाऊच विक्रेता सचिन हुकूमचंद जैन रा.चोपडा या दुकानदारांकडून नगरपालिकेच्या पथकाने ५ पाणी पाऊच बॅगा ताब्यात घेतल्या असून एका बागेत १०० पाऊच अशा ५०० प्लास्टिक पिशवी पाणी पाऊच पकडले होते.याचा कायदेशीर पंचनामा शहरातील दोन पत्रकारांसमोर करण्यात आला होता मात्र सदरील ५ हजार रुपये दंडाचा पंचनामा बदलवून निव्वळ ५०० रुपये दंडाचा पंचनामा करण्यात आला त्यामुळे या पथकाने “तोडपाणी” करून दंडाची रक्कम कमी केल्याची चर्चा शहरात जोरदारपणे सुरू आहे.शेकडो नागरिक व दोन पत्रकारांसमोर ५ हजार दंडाचा पंचनामा केल्याची माहिती शहर समन्वयक शुभम पाटील,किशोर पवार यांनी उपस्थित पत्रकारांना दिली होती मग दंडाची पावती ५०० रुपये कशी झाली? यावरुन संशय व्यक्त केला जात आहे.नगरपालिका प्रवेशद्वार जवळ आरोग्यासाठी हानीकारक प्लास्टिक पिशवीत पाणी पाऊच विकून सदरील दुकानदार परिसरात अस्वछता पसरवीत होता अशी माहिती न.पा. प्रशासनास मिळाल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक व्ही. के.पाटील,शहर समन्वयक शुभम पाटील,किशोर पवार, विजय शिरसाठ यांनी सदरची कारवाई केली होती यासाठी दुकानदारास ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला असता दुकानदाराने सदरील दंड न भरल्यास प्लास्टिक बंदी कायदा अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे या पथकाकडून पत्रकारांना माहिती देण्यात आली होती मग पाणी कुठे मुरले? गेल्या आठवड्यात दि.१३ रोजी आरोग्य निरीक्षक व्ही. के.पाटील यांच्यासह पथकाने शहरातील साई हॉटेल,राजेश किराणा,मोहम्मद खाटीक यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार दंडाची तर बापू टी हाऊस व जयगुरुदेव कोल्ड्रिंक्स यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली होती मग या पाणी पाऊच विक्रेता सचिन हुकूमचंद जैन याच्यावर फक्त ५०० रुपयांची दंडाचीच कारवाई का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या कारवाईची मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करावे व दंडाची उर्वरीत रक्कम वसूल करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]