महाराष्ट्र 9

चोपडा नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींचे निवडणूक बिनविरोध समित्या गठीत करण्यासाठी आँनलाईन आढावा बैठक

[espro-slider id=13780]

महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायती व औद्दोगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 63 (2) व (2-अ) व महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायती (विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक) नियम 2006 नुसार चोपडा नगरपरिषदेचे विषय समिती सभापतींचे निवडणूकीसाठी वार- बुधवार, दि.20/01/2021 रोजी दु. 12-00 वाजता पिठासिन अधिकारी तथा तहसिलदार सो., चोपडा श्री.छगन वाघ यांचे अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या “श्री छत्रपती शिवाजी महाराज” सभागृहातून Video Conferencing व्दारे आयोजित विशेष सभेस अध्यक्षा सौ.मनिषा जीवन चौधरी, गटनेते चोपडा विकास मंच, श्री.जीवन चौधरी तसेच शिवसेना गटनेते श्री.महेश पवार, मुख्याधिकारी श्री.अविनाश गांगोडे यांचेसह एकूण 25 सन्माननीय नगरसेवक तथा विषय समिती सदस्य सभेस Online उपस्थित होते. त्याआधी सदर सभेचे कार्यक्रम पत्रिकेनुसार सकाळी 10-00 ते दुपारी 12-00 या विहीत वेळेत सन्माननीय विषय समिती सदस्यांकडून समिती निहाय नामनिर्देशन पत्र मुख्याधिकारी यांचेकडेस सादर करणेत आले. तद्नंतर दुपारी 12-00 वाजता पिठासिन अधिकारी सो., यांनी प्रस्तुत विशेष सभेस उक्त नमूदपणे गणपूर्ती झालेने विशेष सभा कामकाज सुरु करणेचे निर्देश दिले व त्याअनुषंगाने विषय सूचीनुसार कामकाजास सुरुवात झाली. मुख्याधिकारी यांचेकडेस सादर करणेत आलेले विषय समिती निहाय प्रत्येक विषय समितीसाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते. प्राप्त सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी करणेत आली व छाननी अंती प्राप्त सर्व नामनिर्देशन पत्रे वैध असलेचे घोषित करणेत आले. त्यानंतर उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र माघारीसाठी 15 मिनिटांचा अवधी देणेत आला. तथापि विहीत मुदतीत एकही उमेदवाराने नामनिर्देशन पत्रे माघारी घेतले नाही. त्यानुसार पुढील प्रमाणे विषय समिती सभापतींचे निवडणूक बिनविरोध झालेचे जाहीर करणेत आले. त्यानुसार प्राप्त नामनिर्देशन पत्रांच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम समिती सभापती म्हणून श्री.रमेश शिंदे, शिक्षण व विद्युत समिती सभापती म्हणून श्री.राजेंद्र गुजर (राजाराम पाटील), स्वच्छता वैद्दक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती म्हणून सौ.सुप्रिया सनेर, पाणी पुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापती म्हणून श्री.गजेंद्र जायसवाल, महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून सौ.दिपाली चौधरी यांची बिनविरोध निवड झालेचे जाहीर करणेत आले. तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायती व औद्दोगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 64 नुसार स्थायी समिती सभापती म्हणून नगराध्यक्षा सौ.मनिषा चौधरी तसेच कलम 59 (2) अन्वये असलेल्या तरतूदीनुसार उपाध्यक्ष श्री.भुपेंद्र गुजराथी यांना नियोजन व विकास समितीचे पदसिध्द सभापती म्हणून घोषित करणेत आले. येणेप्रमाणे विषय समिती सभापती निवड झालेनंतर पिठासिन अधिकारी तथा तहसिलदार, चोपडा यांनी दुपारी 12-45 वाजता सभा संपलेचे जाहीर केले व सर्व Online उपस्थित सदस्यांचे आभार मानले.


Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]