घाडवेल ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनलचे वर्चस्व..….
4 – 3 काट्याची लढतीत मनिषा पाटील एका मताने विजयी …
चोपडा प्रतिनिधी – घाडवेल ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाल धक्कादायक लागला असून सात जागांच्या निकालात 4 – 3 ने सामना रंगला असतांना परिवर्तन पॅनेलने 4 जागा जिंकत ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे .प्रभाग क्रमांक 1 मधून नरेंद्र निंबा पाटील यांना 310 मते तर नगीन साहेबराव पाटील यांना 169 मते मिळाली आहेत .मोरे जालुबाई संभाजी यांना 309 मते तर भिल सरला सुकलाल यांना 172 मते मिळाली आहेत .मालतीबाई प्रेमचंद चौधरी यांना 276 मते तर चौधरी अरुणा रमेश यांना 205 मते मिळाली आहेत .
प्रभाग क्रमांक 2 मध्ये पाटील विजय मोहन यांना 170 मते तर पाटील दिलीप दगडू यांना 139 मते मिळाली आहेत .पाटील दीपिका दिलीप यांना 181 मते तर शोभाबाई रविंद्र पाटील यांना 129 मते मिळाली आहेत
प्रभाग क्रमांक 3 मध्ये भिल शांताराम गंगाराम यांना 192 मते तर भिल बन्सीलाल रामदास यांना 189 मते मिळाली आहेत .अवघ्या एका मताने विजय व पराजय चर्चेचा विषय ठरला आहे.
परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार व सरपंच पदाचे दावेदार मालतीबाई प्रेमचंद पाटील ह्या आहेत .तसेच विजयी उमेदवारांमध्ये नरेंद्र निंबा पाटील , जलुबाई संभाजी मोरे ,मनिषा मंगल पाटील यांच्या समावेश आहे
चुरशीच्या लढतीत गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींसह मातब्बरांनी जंग ठोकले होते त्यात कमलाकर निंबा पाटील, नरेंद्र भाईदास चौधरी, डॉ आनंदराव छनू पाटील ,गजानन हरी पाटील , प्रेमचंद पाटील , गोपाल रामचंद्र चौधरी, भास्कर बाबुराव पाटील, अशोक रमण पाटील, रामसिंग दौलत पाटील, रुपसिंग दौलत पाटील ,बळीराम लक्ष्मण पाटील ,रामसिंग झावरू पाटील,गजानन धनसिंग पाटील, नवल श्रीराम पाटील, आत्माराम प्रल्हाद पाटील, विजय देवराम पाटील, भागवत दगडू पाटील , मच्छीद्र झावरू पाटील , जगन्नाथ झावरू पाटील ,गयभू ताराचंद पाटील, खेमराज भिका पाटील , विकास छनू कोळी ,बाळू वामन कोळी ,वसंत विठ्ठल पाटील ,सुरेश रामकृष्ण धनगर, मंगल ज्ञानेश्वर पाटील, साहेबराव ज्ञानेश्वर पाटील, बन्सीलाल पाटील, बन्सीलाल मोरे, ज्ञानेश्वर बळीराम पाटील आदिंनी परिश्रम घेतले…..
