*प्रताप विद्या मंदिराच्या टेक्निकलची विद्यार्थिनी जिया तडवी घेणार रामेश्वर येथील अंतराळ मोहिमेत बालवैज्ञानिक म्हणून सहभाग
चोपडा (प्रतिनिधी) चोपडा एज्युकेशन सोसायटी चोपडा संचलित प्रताप विद्या मंदिराची व्यावसायिक अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी जिया तडवी या एकमेव विद्यार्थिनीची रामेश्वरम येथे 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतराळ मोहिमेसाठी चोपडा शहरातून निवड करण्यात आली आहे. 7 फेब्रुवारीला रामेश्वर येथून 1000 उपग्रह अंतराळात एकाच वेळी झेपावणार आहेत. यात देशभरातील 1000 सहभागी विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 356 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात चोपडा शहरातून या विद्यार्थिनीचा समावेश झालेला आहे. या बालवैज्ञीकाचे नुकतेच तज्ज्ञ संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली सहा दिवसाचे उपग्रह निर्मिती विषयक प्रशिक्षण पूर्ण झाले. यावेळी हीच उपक्रमाच्या अर्थ, उपक्रमाचे कार्य, त्यासंदर्भातील कार्यप्रणाली व मिळणारे परिणाम याविषयी माहिती देण्यात आली.
सर्वात कमी वजनाचे म्हणजेच 25 ग्रॅम ते 60 ग्रॅम वजनाचे एकूण 100 उपग्रह बनवून त्यांना 35 ते 38 हजार मीटर उंचीवर सायंटिफिक बलून द्वारे प्रस्थापित केले जाणार आहे. या अगोदर 14 फेब्रुवारी 2017 रोजी एकाच रॉकेट द्वारे 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर आहे.
तर जिया तडवी या विद्यार्थिनीची संस्थेचे चेअरमन राजाभाई मयूर, अध्यक्ष विठ्ठलकाका गुजराथी, उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, सचिव माधुरीताई मयूर, मुख्याध्यापक डी व्ही याज्ञिक, उपमुख्याध्यापक आर आर शिंदे, पर्यवेक्षक जी वाय वाणी, आर बी पाटील, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार , समन्वयक गोविंदभाई गुजराथी सर्व शिक्षक बंधू भगिनी आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.





