महाराष्ट्र 9

आॕर्किड इंटरनॕशनल स्कूल चोपडा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती आॕनलाईन पध्दतीने साजरी

[espro-slider id=13780]

आॕर्किड इंटरनॕशनल स्कूल चोपडा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती आॕनलाईन पध्दतीने साजरी

चोपडा (प्रतिनिधी)सचिन जैस्वाल
चोपडा येथील यशोधन चॕरिटेबल ट्रस्ट संचलीत आॕर्किड इंटरनॕशनल स्कूल मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती आॕनलाईन पध्दतीने साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डाॕ.श्री राहुल पाटिल यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमा पुजन केले. कार्यक्रमास ज्यु.के.जी, सिनि.के.जी. व इ.१ ली ते ४ थीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. इ.३री व ४ थीच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे विचार कथन केले.शाळेचे मुख्याध्यापक यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार व जीवनातील प्रसंग तसेच राजमाता जिजाऊ एक आर्दश गुरु व आई होत्या यावरील प्रसंग कथन केले. अध्यक्षिय भाषणातुन डाॕ राहुल पाटिल यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श गुणांची कास धरुन, जीवनात आचरणात आणून आदर्श व्यक्तिमत्त्व होण्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नितेश वाघ यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, समन्वयक,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]