महाराष्ट्र 9

बदलत्या जगामुळे शिक्षण क्षेत्रासमोर अनेक संधी आणि आव्हाने: महेश महाजन( प्र वि मं च्या १०३ व्या वर्धापन दिनानिमित्त साधला ऑनलाईन संवाद)

[espro-slider id=13780]

चोपडा (प्रतिनिधी) :सचिन जैस्वाल

बदलत्या जगामुळे शिक्षण क्षेत्रासमोर अनेक संधी आणि आव्हाने: महेश महाजन
( प्र वि मं च्या १०३ व्या वर्धापन दिनानिमित्त साधला ऑनलाईन संवाद)

कोरोना काळातील बदललेली परिस्थिती पाहता बदलत्या जगामुळे शिक्षण क्षेत्रासमोर अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत तसेच काही आव्हाने देखील उभी राहिलेली आहेत या संधी आणि आव्हानांचे सोनं करणे ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी आहे

असे प्रतिपादन चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या १०३ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात बोलताना प्र वि मं चे माजी विद्यार्थी व लार्सन अँड टुब्रो कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर महेश महाजन यांनी केले. बदलते जग आणि बदलते शिक्षण या विषयावर ऑनलाईन संवाद साधताना पुढे ते म्हणाले की आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल टेक्नॉलॉजी ,एज्युकेशन बॉट, आदी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात अनेक नवनवीन ज्ञानाची कवाडे उघडी झाली आहेत .तर या बदलत्या शिक्षण तंत्रांचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक कशी भागवावी अशी अनेक आव्हाने शिक्षकांसमोर देखील उभी ठाकणार आहेत. या आव्हानांचा सामना करून बदलत्या जगात शिक्षण क्षेत्राला कार्य करावे लागणार आहे. कुठलाही व्यवसाय किंवा कार्य करताना त्यावर संपूर्ण प्रभुत्व प्राप्त केले तर ते काम यशस्वी होतेच; गरज असते ती फक्त जिद्द, चिकाटी, धडपड आणि अविरत श्रम करण्याची. अपयशाला घाबरून न जाता यशाकडे वाटचाल करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे तरच बदलत्या जगाच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आपला टिकाव लागू शकतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देताना संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी कोरोना काळातदेखील शाळेने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संस्थेच्या विविध ज्ञानशाखांनी सुरू केलेल्या नवनवीन उपक्रमांचा उल्लेख करीत त्या ज्ञानशाखांचे आणि उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक केले. संस्थेच्या प्रगतीसाठी आर्थिक हातभार लावणाऱ्या अनिल शर्मा,महेश शर्मा या शर्मा बंधूसोबतच मुख्याध्यापक डी व्ही याज्ञिक, नागलवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय एच चौधरी, पर्यवेक्षक जी वाय वाणी, माजी उपमुख्याध्यापक एस आर पाटील, उपशिक्षक व्ही एन पाटील,प्रयोगशाळा परिचर लक्ष्मण शेट्टी आदी देणगीदारांचा देखील त्यांनी गौरव केला. तसेच वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यासाठी खाऊ वाटपाच्या दातृत्वाची जबाबदारी सौ भारती धनंजय याज्ञिक यांनी स्वीकारली म्हणून त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
मार्च 2020 च्या एस एस सी परीक्षेत विद्यालयातून प्रथम आलेल्या अमोल मुरलीधर पाटील यास उमा सुवर्णपदक तसेच कै.गोविंद माळी स्मृतिप्रीत्यर्थ एक हजार रुपये रोख देण्यात आले.फेब्रुवारी 2020 च्या एच एस सी परीक्षेत विज्ञान शाखेत ॲग्री विषयात प्रथम आलेल्या नेहा सोपान पाटील हिस कै प्रा रवींद्र मुरलीधर पाटील प्राईज 2100 रुपये रोख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई , सचिव माधुरीताई मयूर, संचालक चंद्रहासभाई गुजराथी, भूपेंद्रभाई गुजराथी, सभासद प्रफुल्लभाई गुजराथी,किरणभाई गुजराथी, अरविंदभाई गुजराथी,तसेच डॉ प्रवीण सप्तर्षी, डॉ रमाताई सप्तर्षी, विविध ज्ञानशाखांचे पदाधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक डी व्ही याज्ञीक , उपमुख्याध्यापक आर आर शिंदे, पर्यवेक्षक जी वाय वाणी, आर बी पाटील, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार, संस्था समन्वयक गोविंदभाई गुजराथी, उल्हासभाई गुजराथी, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी,माजी पदाधिकारी, माजी शिक्षक व गुणवंत विद्यार्थी, पालक तसेच ऑनलाइन च्या माध्यमातून अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पी बी कोळी,डी एम वैद्य,पी ए नागपुरे व त्यांच्या गानवृंदाने प्रविमं गीत व स्वागत गीत सादर केले.आभार प्रदर्शन मुख्याध्यापक डी व्ही याज्ञिक यांनी तर सूत्रसंचालन ए एन भट व व्ही ए गोसावी यांनी केले.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]